Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात 'एच३एन२' विषाणूचा प्रसार, १५ दिवसांत २५ रुग्णांची नोंद ; पालिकेकडून सतर्कतेचे निर्देश

ठाण्यात ‘एच३एन२’ विषाणूचा प्रसार, १५ दिवसांत २५ रुग्णांची नोंद ; पालिकेकडून सतर्कतेचे निर्देश

Subscribe

एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच त्याचा उपप्रकार असलेला H3N2 (इन्फ्लुएन्झा) च्या ही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसात २५ रुग्ण नोंदवले गेले आहे. त्यामध्ये एका मृत्यू ही झालेला आहे. या वाढत्या रुग्ण संख्येबाबत सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात H3N2 (इन्फ्लुएन्झा) ची कोणतीही लक्षणे दिसू लागली तर चाचणीच्या निकालाची वाट न पाहता तत्काळ उपचार सुरू करण्याच्या सूचना शहरातील सर्व डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, नागरिकांनीही कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.
आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांना याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात. गरज भासल्यास बैठक घ्यावी, माहिती पत्रकांचे वाटप करावे. आरोग्य केंद्रांच्या व्हॉट्सॲप समूहात मार्गदर्शक सूचनांची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इन्फ्लुएन्झाची लक्षणे पुढीलप्रमाणे असून त्याबाबत अंगावरती आजार काढू नयेत त्वरीत डॉक्टरांना संपर्क करावा.

खाजगी डॉक्टरांची भूमिका महत्वाची

- Advertisement -

बरेच नागरिक आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर सर्वप्रथम खाजगी डॉक्टरांना संपर्क करतात. त्यांच्याकडून योग्य उपचार मिळाले नाही तर पुढे गंभीर परिणाम होवू शकतात. यासाठी खाजगी डॉक्टरांना आरोग्‌य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरी आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांनी खाजगी डॉक्टरांचे व्हॉटसॲप ग्रुप बनविले असून त्याद्वारे खाजगी डॉक्टरांशी समन्वय ठेवला जात आहे. तापाचा रुग्ण आल्यानंतर कोणती कार्यवाही करावी याची मार्गदर्शक प्रणाली तयार करुन ती सर्वच खाजगी डॉक्टरांना वितरित केली असून जर एखादा रुग्ण H3N2 लक्षणाचा आढळून आला तर त्वरीत संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. इन्फ्लुएन्झाचे प्रमाण वाढत असले तरी काही गोष्टीची काळजी घेतली तर आपण हा आजार टाळू शकतो.

– इन्फ्लुएन्झाची लक्षणे

- Advertisement -

सौम्य ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, धाप लागणे, छातीत दुखणे, खोल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर – काळी पडणे, मुलांच्यामध्ये चीडचीड.

– इन्फ्लुएन्झा टाळण्यासाठी हे करावे

 • वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे.
 • पौष्टिक आहार घ्यावा.
 • धूम्रपान टाळावे.
 • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी.
 • भरपूर पाणी प्यावे.
 • लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा.
 •  हे करू नका – 
  – हस्तांदोलन टाळावे
  – सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
  – डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेवू नये.
  – आपल्याला फ्लू सदृश लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जावू नये.


  हेही वाचा : शिर्डीत भाविक-सुरक्षा रक्षकांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं


- Advertisment -