सपाचे अबू आझमी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर, 20हून अधिक ठिकाणी छापेमारी

मुंबई – समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे मारले आहेत. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशांसंबधी ही कारवाई करण्यात आली. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ यांसह इतरही ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

अभा गुप्ता आणि अबू आझमी यांचं कार्यालय असलेल्या कुलाब्यातील कलम मेन्शन या इमारतीत प्राप्तिकर विभागाने धाड मारली. अभा गुप्ताद्वारे कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुप देखील इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहे. इन्कम टॅक्स विभागानं हवाला ऑपरेटर्सकडे छापेमारी केली आहे.

अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे. तर, आभा गुप्ता अबू आझमी यांचे जवळचे नातेवाईक आहेत. तर, सपाचे महासचिव गणेश गुप्ता यांच्या अभा गुप्ता या पत्नी आहेत.