घरताज्या घडामोडीमुद्रांक चोरीप्रकरणी संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना

मुद्रांक चोरीप्रकरणी संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना

Subscribe

पोलीसांनी घेतली कार्यालयाची झाडाझडती

देवळा येथील बनावट मुद्रांक प्रकरणाचे खोदकाम सुरू झाले असताना, आता पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे (आयजीआर) नेण्यात येणारी दुय्यम निबंधक कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले असून, ‘आयजीआर’च्या पथकाने नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. तसेच शुक्रवारी पोलिस पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ मध्ये पोलिस पथकाने येत चौकशी सुरू केली आहे. यावेळी काही अधिकारी, कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदविण्यात आले.

देवळा तालुक्यात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्तऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार केल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला आहे. याशिवाय जिल्ह्यात मालेगावसह अन्य काही ठिकाणीदेखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तब्बल ४० हजार दस्त तपासून घेण्याचे काम सुरू झाले असताना, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयातील काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात (आयजीआर) पोहोचविणे आवश्यक असतानाच ते चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणात कारवाई सुरु झाली आहे.या घोटाळ्यात ५० हजारांहून अधिक खरेदीखतांद्वारे जमिनी हडप केला गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. म्हणजे सुमारे ५०० ते १००० कोटींचा हा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे काम सुरू झाले असून कागदपत्रे चोरीप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी पंचक येथील सुनिल पवार विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पोलिस पथक दुय्यम निबंधक 2 कार्यालयात दाखल होत त्यांनी तपास सुरू केला आहे. कार्यालयात पोलिस पथक आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

- Advertisement -

कार्यालयाची तपासणी करण्यात येउन पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी तेथील अधिकारयांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. संशयित सुनिल पवार सध्या फरार असून त्याच्या शोधात पथके रवाना केली आहेत.
रियाज शेख, पोलिस निरीक्षक, गुन्हे विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -