घरमहाराष्ट्रगोविंदा पथकांच्या मदतीला रुग्णालय सज्ज

गोविंदा पथकांच्या मदतीला रुग्णालय सज्ज

Subscribe

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबईत सर्वत्र दही हंडी साजरी करण्यात येणार आहे. या दही हंडीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरा रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.

मुंबई – एकीकडे दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत असताना दुसरीकडे दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागल्याचंही चित्र दिसून येत आहे. यात बऱ्याचदा उंचावरून पडल्याने अनेक गोविंदांना हातापायाला फ्रॅक्चर, डोके, स्कॅल्प किंवा मेंदूला गंभीर दुखापत झालेली आहे. अशा स्थिती जखमी गोविंदांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळणं गरजेचं आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. हे जाणून दहीहंडी सणात उत्सवाचा बेरंग होऊ नये आणि जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने एसआरव्ही ममता रूग्णालयाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अपघातात जखमी झालेल्या गोविंदांना तातडीने रूग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबईत सर्वत्र दही हंडी साजरी करण्यात येणार आहे. या दही हंडीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरा रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु दही हंडीचा आनंद साजरा करताना प्रत्येक गोविंदाने आपली स्वत:ची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. याबद्दल लोकांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. याशिवाय जखमी गोविंदावर तातडीने उपचार होणं ही आवश्यक आहे. यासाठी एसआरव्ही ममता रूग्णालयाने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

एसआरव्ही ममता रूग्णालय (गोरेगाव) युनिट हेड डॉ. किरण सिंग म्हणाल्या की, दहीहंडी फोडण्यासाठी स्तरावर स्तर रचले जातात. अशावेळी स्तर कोसळल्याने दुखापत होण्याची दाट शक्यता असते. यात प्रामुख्याने हातापायाला फ्रॅक्चर होणं किंवा डोक्याला गंभीर जखम होऊ शकते. किंवा मानेच्या किंवा पाठीच्या मणक्याला ईजा झाल्यास त्याचे दुरगामी गंभीर दुखापत होउ शकते. अशावेळी त्या रुग्णास योग्यप्रकारे हाताळुन रुग्णास रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील गंभीर धोके टाळता येऊ शकतात.

एखाद्या गोविंदाला उंचावरून पडल्याने डोक्याला मार लागल्यास त्याला तातडीने रूग्णालयात नेऊन गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणं गरजेचं असतं. परंतु, योग्य सोयी-सुविधा न मिळाल्याने उपचारास विलंब होतो. अशावेळी गोविंदाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. या विचाराने गोविंदांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रूग्णालयानं पुढाकार घेतला आहे. याद्वारे गंभीर गोविंदावर रूग्णालयात वेळेवर पोहोचता यावेत, यासाठी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक गोविंदा पथकासाठी यासंदर्भात हेल्पलाईन नंबर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आपतकालीन विभाग या क्रमांकावर संपर्क साधू शकता

- Advertisement -
  • एसआरव्ही रूग्णालय, मुंबई – 8451800800
  •  एसआरव्ही ममता रूग्णालय, डोंबिवली – 86036 00600
  • एसआरव्ही ममता रूग्णालय, गोरेगाव – 7209600600

या क्रमांकावर कॉल केल्यास तातडीने रूग्णवाहिका तातडीने उपलब्ध होईल.


हेही वाचा :यंदा गोविंदांच्या सुरक्षेसाठी मनसेचं ‘चिलखत’ तर भाजपकडून विमा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -