Homeमहाराष्ट्रSS UBT On President : राष्ट्रपती भवन हा रबरी शिक्काच, ठाकरे गटाची...

SS UBT On President : राष्ट्रपती भवन हा रबरी शिक्काच, ठाकरे गटाची सडकून टीका

Subscribe

राष्ट्रपती हे संविधानाचे रखवालदार असतात, पण त्यांच्याकडून संविधान रखवालीचे काम इमानदारीने होते काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने विचारला आहे.

SS UBT On Rashtrapati Bhavan : मुंबई : राष्ट्रपती हे संविधानाचे रखवालदार असतात, पण त्यांच्याकडून संविधान रखवालीचे काम इमानदारीने होते काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने विचारला आहे. देशाच्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले की, ‘संविधान सभेच्या रचनेत प्रजासत्ताक मूल्यांचे प्रतिबिंब आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे आपल्या वारशाचे भाग आहेत. असे असले तरी अलीकडे अशा भाषणांना काहीच अर्थ राहिलेला नसल्याचा टोला देखील ठाकरेंनी आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून लगावला आहे. (ss ubt criticises rashtrapati bhawan over republic day speech)

ठाकरे म्हणतात, विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदार नोंदणीपेक्षा मतदान जास्त कसे झाले? एखाद्या बूथवर 411 मतदारांनी मते टाकली आणि ईव्हीएम उघडताच ती 522 कशी झाली? महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 25-30 हजारांचे बेनामी, अनौरस, लावारीस मतदान मोजले गेले. हे कसे घडले, असा सवालही ठाकरेंनी केला आहे. यांच्या विजयाचा बाप लावारीस असेल तर ही निवडणूक आणि त्यांचा विजयही गैरसंविधानिक ठरतो. गेले काही महिने संवैधानिक मूल्यांची हत्या होत असल्याचे ओरडून ओरडून सांगितले जात असतानाही राष्ट्रपती भवनाच्या भिंती कठोरपणे लोकशाही संविधानाची हत्या पाहात राहिल्या. त्याच राष्ट्रपती भवनातून संविधान सभेच्या प्रजासत्ताक मूल्यांबाबत देशाला संदेश मिळाला म्हणून आश्चर्य वाटले. पण, आमचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील लावारीस मतदान हे संविधानाच्या कोणत्या मूल्यात बसते ते आधी सांगा, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात उकाडा वाढणार, तापमानात वाढ होण्याचे संकेत

देशाच्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती मुर्मू यांनी संदेश दिला की, ‘संविधान सभेच्या रचनेत प्रजासत्ताक मूल्यांचे प्रतिबिंब आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे आपल्या वारशाचे भाग आहेत.’ अर्थात अलीकडे अशा भाषणांना काहीच अर्थ राहिलेला नाही आणि त्यासाठी आपल्या राष्ट्रपतींना दोष देण्यातही अर्थ नाही. संविधानातील कोणत्याही मूल्यांचा आदर गेल्या दहा वर्षांत राखला गेल्याचे दिसत नाही.

राष्ट्रपती या संविधानाच्या रखवालदार आहेत, पण त्यांच्याकडून संविधान रखवालीचे काम इमानदारीने झाले काय? राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांना मध्यरात्री झोपेतून उठवून आणीबाणी लागू करण्याच्या वटहुकुमावर सही घेण्यात आली. आज हे सर्व उघडपणे, दिवसाढवळ्या सुरू आहे. राष्ट्रपती भवन तेव्हाही रबरी शिक्का होता व आताही रबरी शिक्काच आहे. त्यामुळे संविधानाची मूल्ये मोडून राज्य चालवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Live Update : दिल्लीत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली