Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशSS UBT Vs BJP : संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील, ठाकरे...

SS UBT Vs BJP : संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील, ठाकरे गटाने मोदींनी सुनावले

Subscribe

मणिपूर हे मागील दीड वर्षापासूनच वांशिक हिंसेच्या वणव्यात होरपळते आहे. तेथे जाऊन हा वणवा विझवावा असे ना पंतप्रधानांना वाटते, ना केंद्रीय गृहमंत्र्यांना. त्यामुळे काही काळ वरकरणी शांतता दिसते, परंतु एखाद्या घटनेच्या निमित्ताने कुकी आणि मैतेई या दोन समाजांत खदखदत असलेला ‘लाव्हा’ उफाळून येतो.

(SS UBT Vs BJP) मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र तसेच झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. पंतप्रधान मोदी ‘एक है तो सेफ है’ अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत. मोदीसाहेब, महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे, तर हा संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील. तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो ‘अनसेफ’ करीत आहात, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. (Thackeray faction criticizes Modi over Ek hai toh safe hai slogan)

मणिपूरमधील हिंसाचाराने आतापर्यंत 250पेक्षा जास्त निरपराध्यांचे बळी घेतले आहेत. 7 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या फक्त दहा दिवसांत तेथे 17 जण मृत्युमुखी पडले आहेत. मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे, याकडे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार! अजित पवारांना विश्वास

मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्यदेखील आज वांशिक भेद आणि त्यातून उफाळणाऱ्या हिंसाचाराने असुरक्षित बनले आहे ते तुमच्याच राजवटीमुळे. आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा, अशी जहरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

परिस्थिती चिघळल्याने मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ‘आफस्पा’ कायदा लागू करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. सध्या ज्या जिरीबाम जिल्ह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे तेथेही हा कायदा लागू असेल. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला, असे मोठ्या तोंडाने सांगणाऱ्या केंद्रीय सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली? असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला आहे.

मणिपूर हे मागील दीड वर्षापासूनच वांशिक हिंसेच्या वणव्यात होरपळते आहे. तेथे जाऊन हा वणवा विझवावा असे ना पंतप्रधानांना वाटते, ना केंद्रीय गृहमंत्र्यांना. त्यामुळे काही काळ वरकरणी शांतता दिसते, परंतु एखाद्या घटनेच्या निमित्ताने कुकी आणि मैतेई या दोन समाजांत खदखदत असलेला ‘लाव्हा’ उफाळून येतो आणि मणिपूर परत परत हिंसेच्या वणव्यात होरपळत राहते, असे ठाकरे गटाने या अग्रलेखात नमूद केले आहे. (SS UBT Vs BJP : Thackeray faction criticizes Modi over Ek hai toh safe hai slogan)

हेही वाचा – Ajit Pawar : घराणेशाही सर्वत्रच, निवडून येणे महत्त्वाचे; बारामतीबाबत अजित पवारांचे भाष्य


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -