Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSS UBT Vs NCP : अजित पवार यांची सध्याची अवस्था पाहता... ठाकरे...

SS UBT Vs NCP : अजित पवार यांची सध्याची अवस्था पाहता… ठाकरे गटाचे शरसंधान

Subscribe

राज्यात अदानी, लोढा, आशर वगैरे बिल्डर तसेच उद्योगपतींची दलाली करणारे सरकार सत्तेवर बसवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(SS UBT Vs NCP) मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भाषणात वगैरे नेहमी सांगतात, मी कुणाच्या बापाला भीत नाही. मी नेहमी खरेच बोलतो. पण अजित पवार यांची सध्याची अवस्था आणि चेहरा पाहता त्यांचे हे बोलणे खरे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांचे मदारी डमरू वाजवतात आणि त्याबरहुकूम हे उड्या मारतात. हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray faction targets Ajit Pawar over Adani issue)

उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शौर्याचा तसेच स्वाभिमानी बनण्याचा कितीही आव आणि ताव मारला तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे गुलाम आहेत. ही सगळी माकडं आहेत आणि त्यांचे मदारी तिकडे गुजरातमध्ये बसले आहेत. तसे नसते तर अजित पवार यांनी प्रसिद्ध गौतम अदानी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत चोवीस तासांत ‘यूटर्न’ म्हणजे पलटी मारली नसती, अशी जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raju Patil : कोविड घोटाळ्यात सर्वच बरबटलेले; प्रमोद (राजू) पाटील यांचा थेट आरोप

सरकार पाडापाडीच्या खेळासंदर्भात जी बैठक झाली, त्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांसोबत स्वतः अदानी शेठ हे उपस्थित असल्याचा स्फोट पवारांनी केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर मोदी-शहा तसेच अदानी यांचा कसा पगडा आहे ते स्पष्ट केले. पण पुढच्या चोवीस तासांत अजित पवार यांनी घूमजाव केले आणि आपल्या वक्तव्यातून अदानी शेठचे नाव वगळले. आता अजित पवार सांगत आहेत, “त्या बैठकीस अदानी शेठ उपस्थित नव्हते.’’ दिल्ली-गुजरातमधील भाजपा शेठ मंडळींचा बांबू आल्यामुळे अजित पवारांना माघार घ्यावी लागली, असा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

राज्यात अदानी, लोढा, आशर वगैरे बिल्डर तसेच उद्योगपतींची दलाली करणारे सरकार सत्तेवर बसवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

अजित पवारांनी अदानी शेठबाबतचे सत्य सांगितले आणि चोवीस तासांत घूमजाव केले. यामागे दाबदबावच आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यामागे शिंदे-मिंधे टोळीचा कोणताच विचार तसेच नैतिकता नव्हती. अदानी शेठना मुंबई लुटायची आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. या अदानी शेठचे करायचे काय? ते मऱ्हाठी जनतेने ठरवायचे आहे, असे ठाकरे गटाने नमूद केले आहे. (SS UBT Vs NCP : Thackeray faction targets Ajit Pawar over Adani issue)

हेही वाचा – Raju Patil : शिंदे गटाविरोधात आमच्या मनात राग; माहिम मतदारसंघावरून प्रमोद (राजू) पाटलांचा संताप


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -