घरमहाराष्ट्रSSC Board Exam Paper: बोर्डाचा निर्णय! दहावीच्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नासाठी मिळणार एक...

SSC Board Exam Paper: बोर्डाचा निर्णय! दहावीच्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नासाठी मिळणार एक गुण

Subscribe

मुंबई: दहावीच्या 18 मार्च रोजी झालेल्या विज्ञान – 1 या विषयात विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेल्या संदिग्ध प्रश्नासंदर्भात एक गुण दिला जाणार आहे. आमदार कपिल पाटील दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देण्याची मागणी केली होती. त्यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिलं होतं. त्यानुसार बोर्डाने आता दोन्ही उत्तरांना गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. (SSC Board Exam Paper Board Decision Students of class 10 will get one mark for that question)

दहावीच्या विज्ञान भाग 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 1मधील सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा, या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी व पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. या आशयाचे संदर्भीय पत्र या बोर्डाच्या कार्यालयाला प्राप्त झालं आहे.

- Advertisement -

पाठ्यपुस्तकानुसार पाहिलं तर अचूक उत्तर हेलियम आहे. तर काही संदर्भपुस्तकांमध्ये याचं उत्तर हायड्रोजन आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. याच अनुषंगाने आता बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पत्रात काय?

आमदार कपिल पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान एक या विषयाचा पेपर अठरा मार्च रोजी झाला होता. त्यात सर्वात लहान आकाराच्या अणूचं नाव लिहा, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत आपल्याकडे चिंता व्यक्त केल्याचं आमदार कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता या प्रश्नाचं उत्तर हायड्रोजन आहे. पण काही शाळांमध्ये या प्रश्नाचं उत्तर हेलियम, तर काही शाळांमध्ये हायड्रोजन असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, असं पत्रात म्हटलं आहे.

पत्रात म्हटलंय की, हायड्रोजनच्या अणुत्रिज्येची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिज्येची गणना मूल्य 31pm आहे. कारण, जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात संदिग्धता असल्याने, हेलिअम किंवा हायड्रोजन या देन्ही उत्तरांना पूर्ण गुणे देणे उचित होईल. वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक गुणही अतिशय महत्त्वाचा असल्याचंही कपिल पाटील आपल्या पत्रात म्हटलं होतं.

(हेही वाचा: Sanjay Raut: हीच भाजपाची अक्कल; संजय राऊतांचा हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -