घरमहाराष्ट्रSSC Board Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण? परीक्षेत संदिग्ध प्रश्न; बोर्डाला...

SSC Board Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण? परीक्षेत संदिग्ध प्रश्न; बोर्डाला पत्र

Subscribe

दहावी बोर्डाची नुकतीच परीक्षा संपली आहे. परंतु प्रश्नपत्रिकेत संदिग्ध प्रश्न विचारला गेल्याने, विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई: दहावी बोर्डाची नुकतीच परीक्षा संपली आहे. परंतु प्रश्नपत्रिकेत संदिग्ध प्रश्न विचारला गेल्याने, विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुणे देण्याची मागणी केला आहे. जर ही मागणी मान्य झाली तर विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळतील. (SSC Board Exam 10th students to get extra marks Ambiguous questions in exams Letter to the Board)

पत्रात काय?

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान एक या विषयाचा पेपर अठरा मार्च रोजी झाला होता. त्यात सर्वात लहान आकाराच्या अणूचं नाव लिहा, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत आपल्याकडे चिंता व्यक्त केल्याचं आमदार कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता या प्रश्नाचं उत्तर हायड्रोजन आहे. पण काही शाळांमध्ये या प्रश्नाचं उत्तर हेलियम, तर काही शाळांमध्ये हायड्रोजन असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, असं पत्रात म्हटलं आहे.

पत्रात म्हटलंय की, हायड्रोजनच्या अणुत्रिज्येची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिज्येची गणना मूल्य 31pm आहे. कारण, जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात संदिग्धता असल्याने, हेलिअम किंवा हायड्रोजन या देन्ही उत्तरांना पूर्ण गुणे देणे उचित होईल. वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक गुणही अतिशय महत्त्वाचा असल्याचंही कपिल पाटील आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

(हेही वाचा: Loksabha 2024: मविआशी चर्चा फिसकटली? राऊतांकडून वंचितचा भूतकाळात उल्लेख; म्हणाले, ते असते तर..)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -