घरमहाराष्ट्रSSC Exam 2024: दहावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट! 'या' तारखेपासून विद्यार्थ्यांना मिळणार Hall...

SSC Exam 2024: दहावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून विद्यार्थ्यांना मिळणार Hall Ticket

Subscribe

विद्यार्थ्यांना बुधवार 31 जानेवारी 2024 पासून हॉल तिकीटं डाऊनलोड करता येणार आहे. सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च 2024 च्या परीक्षेचे प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीटं ऑनलाइन डाऊनलोड करता येतील.

मुंबई: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना बुधवारपासून म्हणजे 31 जानेवारीपासून मिळणार आहे. राज्य मंडळाकडून दहावीची बोर्डाची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसंच, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. (SSC Exam 2024 Big Update on 10th Exam Students will get Hall Ticket from 31 January date)

त्याच पार्श्वभूमीवर या परीक्षांसाठीही हॉल तिकीट महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बुधवार 31 जानेवारी 2024 पासून हॉल तिकीटं डाऊनलोड करता येणार आहे. सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च 2024 च्या परीक्षेचे प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीटं ऑनलाइन डाऊनलोड करता येतील. बोर्डाच्या https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’ मध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

- Advertisement -

परीक्षा कधीपासून?

बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच जाहीर करण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या काळात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.

या दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा

दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरूवार, दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आणि 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

अर्धा तास आधी पोहचा

परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल, अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करुनच त्यांना परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे वेळेआधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहोचावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

10 मिनिटांचा वेळ अधिक मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देताना दोन्ही परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल, तर यंदा हा वेळ 3 तास 10 मिनिटांचा असणार आहे.

(हेही वाचा: एल्गार सभा ते बैठकांचे सत्र, मंत्री छगन भुजबळ झाले आक्रमक | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -