घरमहाराष्ट्रSSC Exam : ऑल द बेस्ट! दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

SSC Exam : ऑल द बेस्ट! दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

Subscribe

2023-24 वर्षात 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यां परीक्षा देणार आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या 10 वीच्या परीक्षेला आजपासून सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. या 2023-24 वर्षात 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यां परीक्षा देणार आहेत. राज्यातील एकूण 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे बोर्डाकडून देण्यात आली आहे.

दहावीची परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी राज्य मंडळाने विविध उपाय योजना केल्या असून दहावीच्या परीक्षेदरम्यान लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागली, तरी याचा परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली.

- Advertisement -

शरद गोसावी म्हणाले, दहावीच्या परीक्षेत कोणताही गैर प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने तब्बल 271 भरारी पथके तयार करण्यात आले आहे. दहावीच्य परीक्षेच्या काळावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेतील उत्तर पत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परीरक्षक बैठे पथक देखील परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. दहावीच्या परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देणार आहेत.

हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले पुलाच्या कामात पालिकेकडून चूक; चालक वैतागले, जबाबदारी कोण घेणार?

- Advertisement -

दहावीच्या परीक्षेती सर्व विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत 15 लाख 77 हजार 253 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यंदाच्या वर्षात 6 हजार खासगी आणि 8 हजार पुनपरीक्षार्ती वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -