घरमहाराष्ट्रSSC Result 2021: बैठक क्रमांकच माहित नाही? निकाल पाहू कसा ? वेबसाईटवर...

SSC Result 2021: बैठक क्रमांकच माहित नाही? निकाल पाहू कसा ? वेबसाईटवर माहिती उपलब्ध

Subscribe

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा अंतिम निकाल आज शुक्रवारी (१६ जुलै) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे, मात्र काही शाळांकडून अद्याप बैठक क्रमांकच उपलब्ध न करुन दिल्याने निकाल पाहायचा कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे निकाल लागणार तरी कसा याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून होते. मात्र शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे आत्ताचे आणि मागील वर्षाच्या कामगिरीचे मूल्यमापन करत निकाल जाहीर करणार असे स्पष्ट केले. हा निकाल आज जाहीर होणार आहे. तो बोर्डाच्या या अधिकृत वेबसाइट पाहता येणार आहे.

result.mh-ssc.ac.in mahahsscboard.in
mahresult.nic.in sscresult.mkcl.org

 

- Advertisement -

राज्यातील दहावीच्या अंतिम निकाल आज जाहीर होणार असला तरी ९० टक्के विद्यार्थ्यांना स्वत:चा बैठक क्रमांत माहित नाही. परीक्षा झाली नसल्याने शाळांनी हॉलतिकीट दिले नाही. विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच मिळाले नसल्याने परीक्षा क्रमांक देखील माहित नाही. त्यामुळे नक्की निकाल पाहयचा कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने शाळांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट वाटले नाहीत. हॉलतिकीट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा आसन क्रमांक देखील माहिती झालेला नाही. त्यामुळे निकाल कसा पाहावा? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. आसन क्रमांक माहित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर बैठक क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्यामुळे शाळेने बैठक क्रमांक दिले नसले तरी निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी परीक्षा आसन क्रमांक उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना शिक्षण मंडळाकडून वारंवार शाळांना देण्यात आल्या होत्या, मात्र काही शाळांनी विद्यार्थ्यांना आसनक्रमांकाची माहिती दिलीच नसल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे यंदा शाळा सुरू झाल्या नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी परीक्षा आसन क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना शिक्षण मंडळाकडून वारंवार शाळांना देण्यात आल्या होत्या; पंरतु शाळांनी विद्यार्थ्यांना आसनक्रमांकाची माहितीच दिली नसल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्य शिक्षण मंडळाने निकालाची तारीख जाहीर करताच आता सर्व शाळांनी त्यांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फी भरली नाही अशा विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक पाठविले नसल्याचे दिसून आले. अशा शाळांना आता शिक्षण मंडळाने चांगलाच दणका दिला आहे,

बैठक क्रमांकासाठी जावे लागणार शाळेत

विद्यार्थ्यांना दहावीचा अंतिम निकाल पाहण्यासाठी बैठक क्रमांकाची आवश्यकता आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक दिला नाही अशा विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन बैठक क्रमांक घ्यावा लागेल. त्यानंतरचं ते निकाल पाहू शकतील.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -