घरताज्या घडामोडीराज्यात दहावीची परीक्षा घेणे शक्य नाही, गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा,राज्य सरकारचे हायकोर्टात...

राज्यात दहावीची परीक्षा घेणे शक्य नाही, गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा,राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

Subscribe

परीक्षेच्या गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक,शिक्षक महिन्याभरासाठी एकत्र येणार. कोरोनाच्या परीस्थितीत हा धोका पत्करता येणार नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षांवरुन गोंधळ सुरुच आहे. त्यात आज राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र हायकोर्टाकडे सादर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षेच्या गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा,असे उत्तर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून हायकोर्टाला सादर केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थी दहावीच्या परीक्षा पास झाल्याशिवाय त्यांना प्रमाणपत्र देऊ नका, त्याचप्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होऊ नये म्हणून दहावीच्या परीक्षांना स्थगती द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका निवृत्त प्राध्यापक व पुणे विद्यापिठाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. (SSC Exams not possible in state,life of students more important than marks, state government affidavit in high court)

राज्यात असलेल्या SSC,CBSE,ICSEआणि इंटरनॅशन बोर्ड यांच्यात एकवाक्यता नाही. केंद्र आणि राज्य सरकार परीक्षांच्या बाबतीत गोंधळलेले आहेत. आधी दहावीच्या परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अचानक दहावीच्या परीक्षा रद्द करुन बारावीच्या परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे अकरावीच्या विद्यार्थ्यांना इंटरनल गुणांवर पास करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करुन काय साध्य केले? याचा भविष्यात विद्यार्थ्यांवर किती परिणाम होईल याचा विचार न करता निर्णय घेतला,असे थेट प्रश्न आणि आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.

- Advertisement -

राज्य सरकार प्रतिज्ञापत्रात काय म्हणाले?

कोरोनाचा नवा ट्रेन १० ते १८ वर्षांच्या मुलांसाठी घातक असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्यात आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात ४ लाखांहून अधिक जण हे ११ ते २० वयोगटातील असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षा घेण्याचे नियेजन करु शकत नाही. परीक्षेच्या गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक,शिक्षक महिन्याभरासाठी एकत्र येणार. कोरोनाच्या परीस्थितीत हा धोका पत्करता येणार नाही, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात दहावीसाठीचा ३०-२०-५० फॉर्म्युला आणि अकरावीच्या परीक्षांसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी CET परीक्षांची संकल्पना ही सादर केली आहे.


हेही वाचा – HSC Board Exam: बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय केंद्रीय शिक्षणमंत्री घेणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -