घरताज्या घडामोडीSSC Paper Leak : दहावीच्या २ विषयांचा पेपर फुटला?, ५०० रुपयांना प्रश्नपत्रिकांची...

SSC Paper Leak : दहावीच्या २ विषयांचा पेपर फुटला?, ५०० रुपयांना प्रश्नपत्रिकांची विक्री

Subscribe

कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जो पेपर आज होणार होता तो पूर्वसंध्येलाच मुलांच्या मोबाईलमध्ये आला होता. प्रश्नपत्रिकांची विक्री ५०० रुपयांमध्ये विक्री करण्यात आली असल्याची माहिती सध्या मिळत आहे. शिरोळ तालुक्यातील पेपर ठेवण्याची कस्टडी जयसिंगपूरमध्ये आहे. इथूनच पेपर फुटला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी जयसिंगपूरमध्ये पोहोचले असून तपासणी सुरु करण्यात आली आहे.

दहावीचे पेपर फुटल्याच्या बातम्या राज्यात अनेक ठिकाणांहून येत आहेत. दरम्यान परीक्षा सुरु होण्यापूर्वी पेपर जळाल्याने आधीच १ पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. यामध्ये आता विज्ञान- तंत्रज्ञान भाग २ या विषयाचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून देत संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दहावीचा ३० मार्च रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पेपर घेण्यात येत आहे. परंतु पेपरच्या पूर्वसंध्येलाच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये मिळाल्या होत्या. जयसिंगपूरमध्ये पेपर ठेवण्याची कस्टडी आहे. याच ठिकाणाहून जिल्ह्यात आणि तालुक्यात पेपर जात असतात. इथूनच पेपर फुटला आहे. तसेच प्रश्नपत्रिका ५०० रुपयांना विकण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. जयसिंगपूर पोलीस चौकशी करत आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी जयसिंगपूरमध्ये दाखल झाले आहेत.

जयसिंगपूरमध्ये ठेवण्यात आलेले पेपर तपासण्यात येत आहेत. पेपरच्या कोडनुसार तपासणी करण्यात येत आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्यात येत आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पेपर फुटीबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

- Advertisement -

हेही करतो : विमान उड्डाण होण्यापूर्वी दररोज पायलट, एअर होस्टेसची होणार ‘अल्कोहोल टेस्ट’; DGCA चा आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -