Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी SSC Result 2021: विद्यार्थ्यांनो आणखी अर्धा तासांनी पाहता येईल निकाल - बोर्ड

SSC Result 2021: विद्यार्थ्यांनो आणखी अर्धा तासांनी पाहता येईल निकाल – बोर्ड

वेबसाइटवर एकाच वेळी अनेकांनी विझिट केल्याने वेबसाइटवर तांत्रिक बिघाड

Related Story

- Advertisement -

दहावी परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी अर्धातास वाट पहावी लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी देण्यास वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. मात्र आता तो बिघाड दुरुस्त करुन वेबसाइट पुन्हा सुरळीत करण्याचे काम सुरु असून पुढील अर्ध्या तासात दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. (SSC Result 2021: Students can see the result in another half an hour – Board)  दहावी परीक्षांचे निकाल आज लागणार होते मात्र वेबसाइटवर एकाच वेळी अनेकांनी विझिट केल्याने वेबसाइटवर तांत्रिक बिघाड आला होता.

बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी दोन वेबसाइट देण्यात येतात. गेल्या वर्षी देखील या वेबसाइट देण्यात आल्या होत्या मात्र तेव्हा कोणतीही अडचण आली नव्हती. यंदा वेबसाइटवर अशाप्रकारचा तांत्रिक बिघाड कसा आला हे कळू शकले नाही. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेळ लागला आणि आता पुढील अर्ध्या तासात दहावी निकालाची वेबसाइट पुन्हा सुरू होईल असे बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकाल पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता होती. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. अनेक विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी शाळांंबाहेर गर्दी केली आहे.


हेही वाचा – Maharashtra Board SSC Result: अभिनंदन! तब्बल ९५७ विद्यार्थ्यांची शंभर नंबरी कामगिरी

- Advertisement -