घरमहाराष्ट्रSSC HSC Results Update : 'या' दिवशी जाहीर होणार 10 वी आणि...

SSC HSC Results Update : ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वी आणि 12 वीचा निकाल

Subscribe

राज्यातील दहावी, बारावी बोर्डाचा निकाल केव्हा लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. परीक्षा झाल्यानंतर निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागू आहे. अशात दहावी, बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख जाहीर झाली आहे. 10 जून रोजी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा 20 जून रोजी लागू शकतो, अस राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

सध्या 70 टक्के उत्तरपत्रिकांचे काऊंटर स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे नियोजनानुसार कामकाज पूर्ण झाल्यास निकाल ठरलेल्या दिवशीच लागतील असे सांगितले जातेय. दहावी आणि बारावीचा निकाल 10 दिवसांच्या फरकाने लागणार आहे. आधी बारावीचा निकाल जाहीर होईल त्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबई शिक्षण मंडळात बारावीच्य़ा एकूण 18,92,929 उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु असून दहावीच्या 33,20,207 उत्तरपत्रिका तपासणीसाठी आहेत. यातील बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीसाठी 1651 मॉडरेटर आणि दहावीच्या उत्तरपत्रिकांसाठी 2605 मॉडरेटर काम करत आहेत. यातील बहुतांश मॉडरेटर्सकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेय. तर उरलेल्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यंदा 10 वी, 12 वीचे निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला होता. विविध मागण्या अजूनही सरकार दरबारी प्रलंबित असल्याने विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी घेतलेच नाहीत. काहींना हे गठ्ठे बोर्डाकडे पुन्हा पाठवून दिले, त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांना निकाल लागण्यासाठी यंदा उशीर होणार की काय असा प्रश्न बोर्डासमोर निर्माण झाला होता. मात्र राज्य शिक्षण मंडाळाने नियोजित कार्यक्रम आखून उत्तरपत्रिका तपासणीचे काम विनाअडथळा सुरु ठेवलेय. यामुळे तपासण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचे प्रमाण वाढत आहे.

- Advertisement -

खासदार नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, आर्थिक गुन्हे शाखा कर्ज प्रकरणाची चौकशी करणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -