घरमहाराष्ट्रएसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू

एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Subscribe

छ.संभाजीनगर – सिल्लोड-पाचोरा रस्त्यावर काल रात्री एसटी बस आणि सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषणा होता की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बसचा चेंदामेंदा झाला आहे. तर, १५ ते २० जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

३५ ते ४० प्रवासी घेऊन एसटी बस सिल्लोड-पाचोरा मार्गावरून धावत होती. ही बस वांगी फाट्याजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकलचा धडक लागली. दोन्ही चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्यानी ही धडक झाली. यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. तर, ट्रकचालकाच्या मृतदेहाला क्रेनने काढावे लागले. तर, सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कोणतेही सिलेंडर फुटले नसल्याने मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

दरम्यान, अपघातग्रस्त जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जे प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारांसाठी हलवण्यात येत आहे. अपघात भीषण असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

टायर फुटल्याने कारचा अपघात; दोघा तरुणींसह एका तरुणाचा अंत

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी नाशिक सापुतारा महामार्गावरही असाच भीषण अपघात घडला होता. भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. वणी येथील चौसाळे फाटा नजीक झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह तिघांचा जागीच अंत झाला. अपघात इतका भीषण होता की कार अनियंत्रित होऊन जेव्हा रस्त्याच्या बाजूच्या शेतात गेली तेव्हा कार दोन ते तीन वेळा हवेत ५ ते १० फुट वर उडाली. अपघात झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. कारमधील तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर एका जखमीला उपचारासाठी नाशिकला हलवले. मृतांमध्ये दोघा तरुणींचा व एक तरुणाचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -