घरमहाराष्ट्रएसटी बस आदळून पडला प्रवाशाचा दात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

एसटी बस आदळून पडला प्रवाशाचा दात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

एका एसटी बस प्रवाशाला चालक आणि बस प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसला आहे.

एसटी बसने अनेक प्रवाशी प्रवास करतात. वाट पाहीन पण एसटीनेच जाईल, असे म्हटले जाते. मात्र, एका एसटी बस प्रवाशाला चालक आणि बस प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा चांगलाच फटका बसला आहे. बस आढळून प्रवाशांचा दात पडल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. भरत सोनू चिखले (वय ५५) असे या जखमी प्रवाशाचे नाव असून त्यांनी बस चालक नितीन भास्कर पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिखले हे मंचर येथून पुण्याच्या दिशेने येण्यासाठी एसटी बसमध्ये बसले होते. ते पाठीमागच्या सिटवर बसले होते. बसमध्ये अनेक प्रवासी होते. अमळनेर ते पुणे अशी ही बस प्रवास करत होती. भरधाव वेगात असलेली बस भोसरी उड्डाण पुलाच्या पुढे येताच गतिरोधकावरून जोरात आदळली. या घटनेत बसमधील अनेक प्रवासी जोरात आदळले. घटनेत एक महिला आणि मुलगा तर फिर्यादी भरत चिखले हे जखमी झाले आहेत. दरम्यान, चिखले यांचा या घटनेत दात पडला आहे. ते समोरील सीटवर जोरात आदळले. बस काही अंतरावरून थांबवल्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आली. तत्पूर्वी सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले. दरम्यान, भोसरी पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप चिखले यांनी केला. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून अद्याप बस चालकाला अटक नाही. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -