मुंबई | नुकतेच मुंबईच्या बेस्ट सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप केला हेतो. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेतला होता. पण आता ऐन गणपती सणाच्या तोंडावर पुन्हा एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. एसटी कर्मचारी हे पगार वाढ, पदोन्नती आणि अन्य मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपासले आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यातील आगार कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र एसी कामगार संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
एसटी कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. एसटी कर्माचाऱ्यांने 11 सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. या संपादरम्यान 19 सप्टेंबरला गणपती बप्पाचे आगमन होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना संपचा फटका बसणारआहे. एस कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारने 42 टक्के महागाई भत्ता त्वरील लागू करावा, वेतनवाढीचा दर, घरभाडे भत्ता, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली विसंगती दूर करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा – बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखरे मागे; ‘या’ मागण्या झाल्या मान्य
‘मविआ’च्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा संप
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप अनेक महिने चालल्याने नागरिकांचे हाल झाले होते. तेव्हा सरकारने उशिरा का होईना पण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि काही आश्वासने दिली होती. पण एसटी कर्मचाऱ्यांचे अजूनही पगार आणि मगाण्या रखडल्यामुळे ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.