घरCORONA UPDATEएसटी मोफत मग बेस्टकडून लूट का?

एसटी मोफत मग बेस्टकडून लूट का?

Subscribe

बेस्टकडून मुंबईत अडकलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांपर्यत पोहोचविण्यासाठी २० रुपये भाडे आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकीकडे एसटी बसेस मार्फत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी मोफत सेवा देत आहे. मात्र दुसरीकडे बेस्टकडून मुंबईत अडकलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांपर्यत पोहोचविण्यासाठी २० रुपये भाडे आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच बेस्टची पाच रुपये तिकीट असताना सुद्धा २० रुपये तिकीट घेऊन गोरगरीब मजुरांची लूट करण्याचा आरोप मजूर सूरज शर्मा यांनी केला आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून इतर राज्यांतील मजदूर मुंबईसह राज्याचा विविध जिल्ह्यात अडकून पडले होते, त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये १२०० मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच भर उन्हात पायपीट करून व्याकुळ झालेल्या मजुरांना त्यांच्या राज्याचा सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाकडून मोफत बस सेवा पुरविण्यात येत आहे. मात्र बेस्टकडून मुंबईत अडकलेल्या मजुरांना रेल्वे स्थानकांवर पोहोचविण्यासाठी २० रुपये आकारत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून गोरखपूरसाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात आली आहे. पोलिसांनी या मजदूरांना एलटीटी रेल्वे स्थानकांपर्यत पोहोचविण्यासाठी बेस्टचा बसेसची मागणी केली होती. बेस्टकडून या बसेस सुद्धा पुरविण्यात आल्या आहे. मात्र मोफत प्रवास न देता, प्रति प्रवासी २० रुपये असे भाडे आकारण्यात आले आहे. अगोदर या कष्टकरी मजुरांना लॉकडाऊन काळात वेतन नाही. अत्यंत बिकट परिस्थिती त्यांच्यावर असताना मदत करण्याऐवजी २० रुपये तिकीट आकारणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचं आरोप मजूर सूरज शर्मा यांनी केला. या संबंधित बेस्टचा जनसंपर्क अधिकारी यांना विचारणा केली असताना माहिती घेऊन सांगतो असे सांगण्यात आले आहे.

प्रवाशांबरोबर भेदभाव का? 

लॉकडाऊनमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे विमानातून येणाऱ्या  नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी आणि बेस्टचा बसेसची सोय करण्यात आलेली आहे. मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांना हॉटेलपर्यत सोडून देण्यासाठी बेस्टचा बसेस धावत आहे. त्यांच्याकडून कसलेही भाडे आकारत नाही. तसेच एसटीचा बसेस सुद्धा राज्यातील अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी मोफत सेवा देत आहे. मग मुंबईतील मजुरांना फक्त रेल्वे स्थानकांवर सोडण्यासाठी भाडे का आकार आहे? हा एक प्रकारचा भेदभाव असल्याचा आरोप मजुरांनी लावला आहे.

सोमवारी एलटीटीवरून आमची ट्रेन होती, आम्ही आमचा ग्रुप घेऊन वडाळावरून रेल्वे स्थानकांवर पोहोचण्यासाठी बेस्टचा बसेस गेलो. मात्र, आमच्याकडून २० रुपये भाडे आकारण्यात आले आहे.
– सूरज शर्मा, मजदूर, गोरखपूर

आजपर्यत बेस्ट उपक्रम हे अडीअडचणीच्यावेळी मोफत सेवा देण्याचे काम करत होती. परंतु सध्या स्थलांतरीत कामगारांकडून ५ रुपयाऐवजी २० रुपये भाडे आकारून बेस्ट उपक्रमाला काळीमा फासण्याचे काम केले आहेत.
– जगनारायण कहार, सरचिटणीस, बेस्ट कामगार संघटना

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -