घरCORONA UPDATEकामात हलगर्जी करणारा एसटी अधिकारी निलंबित; परिवहन आयुक्तांचा दणका

कामात हलगर्जी करणारा एसटी अधिकारी निलंबित; परिवहन आयुक्तांचा दणका

Subscribe

लॉकडाऊन काळात सुद्धा काही अधिकारी आणि कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनात येत असल्याने एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात विशेष एसटी फेऱ्या चालविण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त सुद्धा अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना आणि विद्यार्थाना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी महामंडळाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र या लॉकडाऊन काळात सुद्धा काही अधिकारी आणि कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनात येत असल्याने एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. नुकतेच मुंबई विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याला निलंबित करून राज्यभरातील एसटी  कर्मचारी-अधिकाऱ्यांना लॉकडाऊन काळात हलगर्जी चालणार नाही असा संदेश या कारवाईतून देण्यात आलेला आहे.

एसटी महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांची बदली झाल्यानंतर संपुर्ण राज्याचा परिवहन विभागाचा भार असलेले परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना एसटी महामंडळाच्या व्यस्थापकीय संचालक अतिरिक्त भार देण्यात आला आहे. अगोदरच शेखर चन्ने यांच्याकडे लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील मालवाहतूक आणि इतरही वाहतूक विषयांमध्ये राज्यांचे परिवहन विभागाचा भार आहे.  त्याचबरोबर एसटी महामंडळातील अत्यावश्यक सेवा, अडकलेल्या नागरिकांनी घरी पोहोचवणे तसेच  परराज्यातून महाराष्ट्राचा मजदुरांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना राज्यात घेऊन येण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच एसटी महामंडळातील दैनंदिन कामकाजाचे नियंत्रण असो याकडे मोठ्या प्रभावीपणे ते काम करत आहे. शेखर चन्ने हे खूप शांत आणि सौम्य स्वभावाचे अधिकारी आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून एसटी महामंडळातील अतिरिक्त कारभार स्वीकारला तेव्हापासून एसटी महामंडळात लक्ष देणे सुरु केले आहे. लॉकडाऊन काळात एसटी महामंडळ आपली अत्यावश्यक सेवा देत आहे. मात्र ही सेवा देत असता एसटीचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी कामात हलगर्जी करत असल्याचे निदर्शनात चन्ने यांच्या आले आहे. त्यामुळे त्यांनी या आपत्कालीन परिस्थिती हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई अभियान सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून नुकतेच मुंबई विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा कर्मचारी आणि अधिकारीवर्गामध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

अशी केली कारवाई

परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या नागरिकांसाठी एसटी बस चालविण्यात येत आहेत, भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एसटीची मोठ्या प्रमाणात सेवा देत आहे. मुंबई विमान तळावरून पुणे, रत्नागिरी, रायगड, नांदेड, नाशिक, पालघर, परभणी, सातारा, वाशिम, नागपुर, वर्धा, सोलापुर, सांगली, ठाणे, अहमदनगर, बुलढाणा, धुळे, कोल्हापूर, लातूरकरिता बस धावत आहेत. यांची जबादारी एसटीचा एका मुंबई विभागातील अधिकाऱ्यांवर दिली होती. मात्र तो अधिकारी कर्तव्यावर हजर झालाच नाही. तसेच त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोन केला असता फोन बंद करून ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कारवाई करत निलंबित केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -