घरCORONA UPDATE'या' काळात गैरहजर राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

‘या’ काळात गैरहजर राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

Subscribe

मुंबईसह उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश एसटी कर्मचारी गैरहजर राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात एसटी महामंडळाने नियोजन केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त ३० टक्केच कर्मचारी कर्तव्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्तव्यावर गैरहजर असल्यास निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी दिले आहेत.

हेही वाचा – Coronavirus : देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत – डॉ. हर्षवर्धन

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. दरम्यान, नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकसुद्धा बंद करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासी सुविधा देण्याचा भार एसटीवर आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे डॉक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी बसेस कमी पडत होत्या. त्यामुळे शासनाने एसटीला फेऱ्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फेत शासनाच्या आदेशानुसार विशेष वाहतूक करण्यात येत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने वाहतुकीचे नियोजन केले होते.

हेही वाचा – Coronavirus Breaking: पुण्यात होम क्वारंटाइन केलेले १० लोक फरार; गुन्हा दाखल

- Advertisement -

त्यासाठी सुमारे ६०० गाड्या रस्त्यावर सोडण्यात येणार होते. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेशही दिले होते. मात्र, यादरम्यान एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी वाहतुकीचा आढावा घेतल्यास दिलेल्या नियोजनाच्या तुलनेत फक्त ३० टक्केच वाहतूक केली जात असल्याचे त्यांना समजले. यावर कारवाईसाठी चालक, वाहक, पर्यवेक्षकीय तसेच इतर कर्मचाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर हजर होण्य़ासाठी लेखी आदेश द्यावे. आदेशानंतरही कर्तव्यावर येत नसल्यास त्यांना गैरहजेरीच्या कालावधीतील वेतन मिळणार नाही. जे कर्मचारी आदेशानंतर कर्तव्यावर येणार नाहीत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -