एअर इंडिया, रेल्वे विकणाऱ्यांनी एसटीवर बोलू नये, बाळासाहेब थोरातांचा भाजपवर घणाघात

Balasaheb thorat slams mamata banerjee without bjp not possible to defeat bjp
"ममता बॅनर्जी युपीएच्या सदस्या नाहीत" नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार, बाळासाहेब थोरातांचा पलटवार

राज्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात भाजपचे नेते सहभागी झाले असून आंदोलन पेटवण्याचे काम भाजप नेत्यांकडून होत असल्याची टीका काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ज्यांनी एअर इंडिया आणि रेल्वे विकल्या त्यांनी आता एसटीवर बोलू नये अशी खोचक प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे यासाठी आंदोलन पुकारले आहेत. महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असून परिवहन मंत्री चर्चा करत असल्याचे थोरात म्हणाले.

काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचा हात असल्याचा पु्न्हा एकदा आरोप केला आहे. भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन आपली राजकीय पोळी भाजत आहेत. थोरात म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप पेटवण्यामध्ये भाजप प्रयत्न करत असल्याचे उघड आहे. ज्यांनी एअर इंडिया विकली आहे. रेल्वे आता विकायला काढला आहे. त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडीने एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे जपणूक केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांशी चर्चा करत आहेत. यामुळे या सर्वच प्रकरणावर लवकर तोडगा निघेल.

जानकर यांचा भाजपला घरचा आहेर

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्य आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमचे सरकार असतानाही एसटी विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा कुठे विलीनीकरण झाले. रस्त्यावर असताना एक बोलायला लागते आणि आत गेल्यावर वेगळं असते. हा सिस्टीमचा भाग असल्यामुळे जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावर पर्याय असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  ‘ते’ कृषी कायदे पुन्हा लागू होऊ शकतात- राजस्थानच्या राज्यपालांचे विधान