घरताज्या घडामोडीST Worker Strike : पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवा,...

ST Worker Strike : पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवा, पडळकरांचा अनिल परबांना टोला

Subscribe

परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला देताना पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचलं आहे. दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा स्वतः कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून विषय सोडवावा असा सल्ला पडळकरांनी अनिल परब यांना दिला आहे. 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. पडळकरांनी पवारांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन डिवचलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावी अशी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. यासाठी मागील १ ते २ महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. एसटीला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांसोबत पवारांनी खुलेआम चर्चा केली आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि एसटीला पुर्वपदावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. यावरुन आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला देताना पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचलं आहे. दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा स्वतः कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून विषय सोडवावा असा सल्ला पडळकरांनी अनिल परब यांना दिला आहे.

- Advertisement -

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला दिला आहे. पडळकर म्हणाले की, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एकजूटीने लढा दिला आहे. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळे शरद पवार यांना तुमच्या विषयाबाबत खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडले, असे पडळकर म्हणाले.

दारं वाजवण्यापेक्षा तुम्ही पुढं व्हा

दरम्यान पुढे पडळकरांनी विनंती केली आहे की, अनिल परब हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सगळे दरवाजे ठोठावत आहेत. त्या पेक्षा स्वतः आझाद मैदानात जाऊन तुम्ही मराठी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा का करत नाहीत त्यांना आश्वासित करावं की बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेची दारे खुली होती. मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, एखादा मोर्चा मुंबईत आला तर त्या मोर्चास आमचे मंत्री सामोरे जातील त्यांच्यासोबत चर्चा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द पाळण्यासाठी दोन पाऊले पुढे जा आणि एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढा त्यांच्याशी चर्चा करा आणि तोडगा काढा असा सल्ला पडळकरांनी अनिल परबांना दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Corona Virus : किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -