घरमहाराष्ट्रST Workers Strike : शरद पवार, अजित पवार आणि परब यांच्यात गुप्त...

ST Workers Strike : शरद पवार, अजित पवार आणि परब यांच्यात गुप्त बैठक; एसटी संपावर तोडगा निघणार?

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या चिघळलेल्या एसटी संपात शिष्टाई करण्यासाठी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांची परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये गुप्तबैठक सुरु आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? विलिनीकरणाचा विचार होणार का? एसटी संपावर तोडगा निघणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी गेले तीन आठवडे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. जवळपास १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे. कमी पगारामुळे केलेल्या आत्महत्या, एसटीच्या खासगीकरणाची चर्चा, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला असून संप अधिकच चिघळत चालला आहे. या चिघळलेल्या संप मिटवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

शरद पवारांचं स्वागतच – मुनगंटीवार

शरद पवार, अ‍ॅड. अनिल परब आणि अजित पवार यांच्या बैठकीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी हा संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असेल तर स्वागतच आहे. ही बैठक फक्त दोनच मुद्यावर होत असेल. एक तर संप सोडवायचा किंवा संप मोडून काढायाचा. या व्यतिरिक्त दुसरं काही चर्चिले जाणार नाही, असं म्हणत संपावर मार्ग निघू शकतो, तो काढावा असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -