घरताज्या घडामोडीST Workers Strike : खासगी वाहतूक बंद करण्याचा एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST Workers Strike : खासगी वाहतूक बंद करण्याचा एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

Subscribe

एसटी म्हणजे सर्वसामान्यांसाठी सोयीचे असणारे वाहन असून, लांबचा पल्ला गाठण्यासाठी खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांना परवडणारे वाहन म्हणून एसटीकडे पाहिले जात होते.एसटीच्या या दीर्घकालीन संपामुळे खासगी वाहतूकदारांनी भाडेवाढ केल्यामुळे अवाच्या सवा पैसे प्रवाश्यांकडून उकळण्यात येत होते. मात्र पुण्यातील एसटी बससेवा सुरु झाली असून, एसटी महामंडळाने खासगी वाहतूकदारांना मोठा दणका दिला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरु आहे. त्यामुळे साहजिकच खाजगी वाहतूक तेजीत सुरु झाली त्यामुळे राज्यातील प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडला. एसटी म्हणजे सर्वसामान्यांसाठी सोयीचे असणारे वाहन असून, लांबचा पल्ला गाठण्यासाठी खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांना परवडणारे वाहन म्हणून एसटीकडे पाहिले जात होते.एसटीच्या या दीर्घकालीन संपामुळे खासगी वाहतूकदारांनी भाडेवाढ केल्यामुळे अवाच्या सवा पैसे प्रवाश्यांकडून उकळण्यात येत होते. मात्र पुण्यातील एसटी बससेवा सुरु झाली असून, एसटी महामंडळाने खासगी वाहतूकदारांना मोठा दणका दिला आहे. स्वारगेट आगार आणि पुणे विभागातील डेपोतून होणारी खाजगी वाहतूक बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. खाजगी वाहतूकदारांनी या एसटी महामंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काल मंगळवारी 11 जानेवारीला एसटी महामंडळाने एक पत्रक काढत हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे खासगी वाहतूकदारांचे मोठे नुकसान होणार आहे.

एसटी संपाबाबत अनेक बैठका झाल्या, त्यानंतर काही दिवसानंतर, सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ऐतिहासिक वाढ करण्यात आली. मात्र तरीही एसटी कर्मचारी त्यांच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. या संपाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले. अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी न लावल्याने खाजगी वाहतूक सुरुच आहे.

- Advertisement -

एसटी कामगार संघटनेने सदावर्तेंची केली हकालपट्टी

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची न्यायालयीन लढाई लढणारे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कामगार संघटनेने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता ठाण्याचे वकील ॲड. सतीश पेंडसे हे न्यायालयीन लढाई लढणार आहेत. सोमवारी एसटी कामगार कृती समितीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कामगार कृती संघटनेनं गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याची घोषणा केली.एसटी विलीनीकरणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. आमच्यातर्फे आम्ही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक केली होती. मात्र, आता आम्ही त्यांना पत्र देत त्यांची नेमणूक मागे घेतल्याचे सांगितले आहे. तसेच, आम्ही आता नव्या वकिलाची नेमणूक केलेली आहे. पुढील सुनावणीला नवीन वकील न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी दिली. तसेच, सदावर्ते यांची नेमणूक करुन फार मोठी चूक झाली, अशी कबुली देखील गुजर यांनी दिली.


हे ही वाचा – Property tax exemption : मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

- Advertisement -

\

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -