घरमहाराष्ट्रआयटम साँग आणि दारुच्या बाटल्या; एसटी कर्मचार्‍यांचं अधिवेशन वादात!

आयटम साँग आणि दारुच्या बाटल्या; एसटी कर्मचार्‍यांचं अधिवेशन वादात!

Subscribe

राज्य एसटी कर्मचारी संघटनांच्या अधिवेशनात दारूच्या नशेत आयटम साँगवर नाचणाऱ्या एस.टी.कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आयटम साँगवर नाचणार्‍या नर्तिका, दारुच्या बाटल्यांचा खच आणि कर्मचार्‍यांचा धिंगाणा यासारख्या कृत्यामुळे आता राज्यातील एस. टी. कर्मचारी वादात सापडले आहेत. निमित्त होते महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या राज्य अधिवेशनाचे. सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल झालेल्या या बहुचर्चित व्हिडीओमुळे एस.टी. प्रशासनाची झोप उडाली आहे. कर्मचारी संघटनांच्या या धिंगाण्यामुळे इतर संघटनांनी देखील नाराजी व्यक्त केली असून कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.

कोल्हापूर येथील तपोवन मैदानात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे ५६ वे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी विविध मंत्रिमहोदयांसह राज्यभरातून कर्मचारी कोल्हापूरात दाखल झाले होते. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यासह अनेक मंत्र्यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र अधिवेशनातून एसटीच्या विकासाचा आणि कर्मचार्‍यांच्या समस्यांचा मुद्दा पुढे आला नसून भलताच मुद्दा समोर आला आहे. अधिवेशन संपल्यानंतर येथे रात्री उशिरापर्यंत एसटी कर्मचार्‍यांचा करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. मात्र इथे पांरपरिक सांस्कृतिक संगीत नाही, तर चक्क आयटम साँगवर नर्तिका नाचत असल्याचे दिसून आले. त्याशिवाय ज्या ठिकाणी हे अधिवेशन पार पडले, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्यांचा खच जमा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे अधिवेशन आता वादात सापडले आहे. सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

अधिवेशन वादत?

महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्य अधिवेशन प्रत्येक वर्षी घेण्यात येते. या अधिवेशनात राज्यभरातून जवळ जवळ दहा हजार कर्मचारी आले होते. मात्र, यंदा या अधिवेशनात पहिल्यांदाच सांस्कृतिक लावण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण चक्क या सांस्कृतिक कार्यक्रमात लावण्यांऐवजी आयटम साँगवर एसटी कर्मचारी धिंगाणा घालत देशी ठुमके देत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाणार्‍या एसटीला एक इतिहास आहे. एसटीचा कणा म्हणून वाहक आणि चालक बघितले जाते. मात्र, त्यांच्या अशा प्रतापामुळे आज एसटीची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना सर्वसामान्य जनता हा व्हिडीओ बघून व्यक्त करत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात आयटम साँग

एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात आयटम साँग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 16, 2020

- Advertisement -

यासंबंधी दैनिक आपलं महानगरने महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्या ज्या क्षेत्रात अधिवेशन होते, त्या त्या क्षेत्रातील सांस्कृतिक कलेचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. त्याचप्रमाणे लावणी कोल्हापूरचा प्रसिद्ध कलाप्रकार असल्यामुळे हा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -