घरCORONA UPDATEएसटीचे कारखाने-कार्यशाळा सुरु होणार

एसटीचे कारखाने-कार्यशाळा सुरु होणार

Subscribe

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आता तर १७ मेंपर्यत लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे. राज्यातील सहा ग्रीन झोनमध्ये एसटी सुरु करण्याची तयारी एसटी महामंडळ करत आहेत. एसटी महामंडळांने नुकतेच रत्नागिरी विभागातील कार्यशाळा आणि एसटीच्या टायर पुनःस्तरीकरण कारखान्यांना काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रीन झोन मधील एसटी बस सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे सतत सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता केंद्र आणि राज्य सरकारने शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाने कोरोना बांधीत रुग्नाचा आढावा घेऊन रेड, ऑरेंज आणि ग्रीन या सारखे तीन झोन पाडून देण्यात आले आहे. या तिन्ही झोनसाठी नव्याने दिशानिर्देश जारी केले असून त्यानुसार राज्य सरकारने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या राज्यात १४ जिल्हे रेड झोनमध्ये, १६ ऑरेंज तर ६ ग्रीन झोनमध्ये गेले आहेत. ग्रीन झोन मध्ये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा आणि गडचिरोलीचा समावेश आहेत. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये सार्वजनिक बस वाहतूक ५० टक्के वहन क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित वावर व अंतर ठेवणे या गोष्टी मात्र त्यासोबत बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने तयारी करणे सुरु केले आहे. ४ मे २०२० ला एसटी महामंडळांनी कोकणातील रत्नगिरी विभागाला कार्यशाळा आणि एसटीच्या टायरपुनःस्तरीकरणं कारखात कामगिरीचे आदेश देण्यात आले आहे. एसटी महामंडळात एकूण ९ ठिकाणी टायर प्लाट आहेत. त्यातील एक रत्नागिरी विभाग आहेत. त्यामुळे लवकरच एसटी रुळावर येण्याचा तयारीत आहे. मात्र त्यासाठी एसटी महामंडळाला मात्र ग्रीन झोन जिल्हातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश आणि संमती आवश्यकता आहे.

- Advertisement -

एसटीच्या कार्यशाळा टप्याटप्यानी सुरु होणार

एसटी महामंडळात राज्यभरात एसटी महामंडळाचे ३१ विभागीय कार्यशाळा, ३ मध्यवर्तीय कार्यशाळा, ९ टायर प्लांट आहेत. कोरोनामुळे फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभाग एसटी धावत होती. बाकी सर्व विभाग बंद होते. मात्र लॉकडाऊन मध्ये आता केंद्र आणि राज्य सरकारने शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरतील एसटीचे कार्यशाळा , मध्यवर्तीय कार्यशाळा आणि ९ टायर प्लांट सुरु करण्याचे नियोजन टप्याटप्यानी एसटी महामंडळ करत आहे. अशी माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्यांची दिली आहे.

जिल्हांतर्गत एसटी धावणार

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला सारख्या जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा शहरात जाणवू लागला आहेत. परिणामी, किराणा,काही ठिकाणी जादा किंमतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्रीन झोन असलेया जिल्हात जिल्हांतर्गत एसटीची सेवा सुरु केल्यास प्रवाशांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, एसटी सेवा सुरु करण्याच्या तयारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकांचे सत्र सुरु आहे. लवकर ग्रीन झोनचा निर्णय होणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -