घरमहाराष्ट्रहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला मंजुरी

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला मंजुरी

Subscribe

पुणे शहरातील बहुचर्चित हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यानच्या मेट्रोच्या तीन क्रमांकाच्या मार्गाचे काम सुरू करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे या मेट्रोच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे शहरातील बहुचर्चित हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यानच्या मेट्रोच्या तीन क्रमांकाच्या मार्गाचे काम सुरू करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे या मेट्रोच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पीएमआरडीएकडून शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो होत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्त्वावर हे काम होत आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी हा एकूण मार्ग २३.५ किलोमीटर अंतराचा आहे. त्यातील १४ किलोमीटरचा भाग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यावर १४ स्टेशन आहेत.

हेही वाचा – मेट्रो कामामुळे पुण्यात नगर रस्त्यावरील बीआरटी बंद!

- Advertisement -

पीएमआरडीएच्या खर्चात जागा खरेदी

पालिका हद्दीतील रस्त्याखालील जागा विनामोबदला, विनाअडथळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मेट्रो स्टेशन जिन्यासाठी आवश्यक जागा मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून योग्य त्या मोबदल्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मालकी हक्काने हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मनपा हद्दीतील आवश्यक खाजगी जमिनीचे संपादन, आवश्यक तेथे एफएसआय किंवा टीडीआर स्वरुपात आणि जेथे एफएसआय किंवा टीडीआर स्वरूपात जागा ताब्यात येणार नाही तेथे पीएमआरडीएच्या खर्चाने करण्यात येणार आहे.


हेही वाचा – तर, मेट्रोचे काम बंद पडणार – आशा धायगुडे-शेंडगे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -