घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर"1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा", मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

“1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा”, मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. उपोषणानंतर सरकारच्या वतीने समिती स्थापन केली आहे. या समितीला नोंदणीसाठी राजघराण्यांनी जुनी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावे, असेही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही जिवंत राहूनच लढा. मराठ्यांच्या गोरगरीब पोरांच्या न्याय देण्याासाठी लढा. कोणीही आत्महत्या करून नका, ही मी तुम्हाला आजही विनंती करतो, असेही ते म्हणाले. पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले, ” २४ डिसेंबरनंतर होणाऱ्या आंदोलनाची तयारी करा. कारण आपल्याला शांततेत आंदोलन करायचे आहे. कोणीही उद्रेक आणि जाळपोळ करायचे नाही. यासाठी आजपासून तयारी करा. त्यासाठी गोवोगावात जा. प्रत्येक गावात स्वत:हून जाऊन सांगा. 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण हे ताकदीने उभे राहिले पाहिजे. कारण आपण न्यायाच्या जवळ आलो आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या गावात जाऊन जनजागृती सुरू करावी. आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात प्रत्येकाने गावा जाऊन सांगा 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावांच्या वतीने ताकतीने साखळी उपोषण सुरू राहिले पाहिजे”, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंब्य्रातील वाद आणखी चिघळणार? पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला उद्धव ठाकरे देणार भेट

राजकीय नेत्यांच्या फराळा जाताना…

राजकीय नेत्यांच्या दिवाळी-फराळ कार्यक्रमाला जाणाऱ्या मराठा बांधवावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राजकीय या राजकारणी लोकांच्या दिवाळी फराळ प्रत्येक वर्षी असतात. जर मराठा समाजाच्या कार्यकर्ते त्यांच्या फराळाला जाणार असतील, तर त्यांनी गेल्या बरोबर एक प्रश्न विचारा तुम्ही मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवावा. जर तुम्ही जाणारा असाल तर नक्की सांगा. जो मराठा समाजाचा माणूस राजकारणींच्या जेवणासाठी जाणार आहे. जेवणापेक्षा आपल्या मुलांचे भविष्य महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही गेलात तर आपण आपल्या प्रत्येक भागातील आगोदर जातीला मानावेनंतर नेत्यांना माना आपण जाणार असाल तर गेल्याबरोबर एक विचारा तुम्ही आजपासून मराठा समाजाच्या पोरांच्या बाजूने उभे राहा.

- Advertisement -

हेही वाचा – Reservation : मराठाच नाही तर ‘या’ जातींमध्येही सापडत आहेत कुणबी नोंदी; अडचणी वाढणार

राजघराण्यांनी जुनी कागदपत्रे समितीला उपलब्ध करून

राजघराण्यांशी जुन्या नोंदीसाठी फोन करणार का? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “त्या वेळची सर्व संस्थाने ही गोरगरीबांच्या कल्याणासाठी होती. आताही गोरगरीबांच्या न्यायासाठी त्यांनी त्यांचे दफ्तर खुले करून दिले पाहिजे. कारण त्यांच्या दफ्तरात असलेल्या नोंदीमुळे मराठा समाजाचे कल्याण होणार आहे. यामुळे राजघराण्यांनी जुनी कागदपत्रे समितीला उपलब्ध करून दिली पाहिजे”, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -