घरमहाराष्ट्रमुंबईसाठी फिल्डींग सुरू; शिंदे-फडणवीस सरकार करणार 'इतके' कोटी खर्च

मुंबईसाठी फिल्डींग सुरू; शिंदे-फडणवीस सरकार करणार ‘इतके’ कोटी खर्च

Subscribe

येत्या दोन महिन्यांत शिंदे- फडणवीस सरकार 125 कोटींहून अधिक खर्च करुन किमान 2.7 दशलक्ष लोकांपर्यत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मागच्या वर्षभरापासून लांबणीवर आहेत. आता या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. कोण किती जागा जिंकणार यावर आतापासूनच भाष्य केलं जात आहे. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारची मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपयांचा खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ( Starting fielding for Mumbai Shinde-Fadnavis government will spend 125 crores to reach to Public )

येत्या दोन महिन्यांत शिंदे- फडणवीस सरकार 125 कोटींहून अधिक खर्च करुन किमान 2.7 दशलक्ष लोकांपर्यत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या दोन महिन्यांत 18 जुलैपर्यंत राबवण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकार तब्बल 52.91 कोटी खर्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 36 जिह्यांतील विकास कामांसाठी राखून ठेवलेल्या एकूण 15 हजार 150 कोटींपैकी 30 कोटी खर्च करण्यासाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.

तसंच, अधिक निधी जमा करण्यासाठी सरकारने आमदारांच्या क्षेत्र विकास निधीतून 70 कोटी काढण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास कामांसाठी खर्च करायवयाच्या 5 कोटींपैंकी 20 लाखांपर्यंतच जनतेसाठी घेणाऱ्या कार्यक्रमासाठई वापरण्यास सांगितले आहेत.

- Advertisement -

अशाप्रकारे, शिंदे-फडणवीस सरकारने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 125 कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. पाटण, सातारा येथे मागच्या आठवड्यात या मोहिमेच्या उद्घाटन समारंभात, राज्य सरकारे 27 हजार हून अधिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि सरकारी कागदपत्रांचे वाटप केले.

( हेही वाचा: मुंबईतल्या घराचं स्वप्न म्हाडाकडून होणार पूर्ण, ४ हजार ८३ घरांसाठी अर्ज भरण्याला सुरुवात )

मुंबईसाठी फिल्डींग सुरु

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी आता फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. प्रत्येकजण किती जागा जिंकणार आणि कोणाला कितीवर आऊट करणार याची भाषा करत आहे. संजय राऊत यांनी 60 च्या आता भाजपला ऑलआऊट करणार असल्याचं म्हटलं तर नितेश राणे म्हणाले की, आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेला 7 मध्येच आऊट करु. मुंबई कोणाची यावरुन दावे प्रतिदावेच सुरु झाल्याचं दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -