घरमहाराष्ट्रNew Year 2023 : देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करताय, मग वाचा ही बातमी...

New Year 2023 : देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करताय, मग वाचा ही बातमी…

Subscribe

New Year Celebration 2023 | कोरोना संसर्ग, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संबंधित मंदिर प्रशासनाने काही नियम केले आहेत. या नियमांचं पालन करूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

New Year Celebration 2023 | मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक देवदर्शनासाठी बाहेर पडले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अक्कलकोट, पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला आहे. कोरोना संसर्ग, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संबंधित मंदिर प्रशासनाने काही नियम केले आहेत. या नियमांचं पालन करूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात नवीन वर्षनिमित्ताने मुंबईकर आवर्जून भेट देतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे हजारो भाविक येत असतात. त्यासाठी १ जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासूनच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – New Year 2023 : मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ निर्णय, खुल्या दुमजली बसमधून करा नवीन वर्षाचे स्वागत

विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरातही हजारो भाविक दाखल होत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात येणार आहे. तसंच, मंदिर नियमित वेळेत बंद राहणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. ३० डिसेंबरपासूनच येथे गर्दी वाढत आहे. साईबाबा संस्थानकडून भक्तांच्या निवासासह भोजन आणि दर्शनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचं नियंत्रण मिळवण्याकरता साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे.

शेगावचं गजानन महाराज मंदिर आज रात्रभर खुलं राहणार आहे. तर, कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात नेहमीच्या वेळेनुसार दर्शन घेता येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरात प्रशासनाने मास्कसक्ती केली आहे. त्यानुसार, रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात भाविक आणि कर्चमाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. तर, जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिरातही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मास्कसक्तीचा निर्णय करण्यात आला आहे. तुळजापूरमध्येही मंदिर परिसरात मास्क अनिवार्य करण्यात आला असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात मोफत मास्क वाटण्यात आलं आहे.

खुल्या दुमजली बसमधून करा नवीन वर्षाचे स्वागत

अवघ्या काहीच तासांत २०२२ वर्ष संपून २०२३ वर्षाला प्रारंभ होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी अनेक प्लान्स आखले असतीलच. नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता मुंबईकर समुद्रकिनारी, हॉटेल, क्लबला पसंती देतात. मुंबईकरांना गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचण्याकरता बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि विद्युत परिवहन उपक्रमने (BEST) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर रोजी बेस्ट ५० जादा गाड्या सोडणार आहे. तसंच, बेस्टची खुली दुमजली बसही (Open Double Decker Best Bus) सोडण्यात येणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -