Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र SSC Result 2023: दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींची बाजी, राज्याचा निकाल 93.83...

SSC Result 2023: दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींची बाजी, राज्याचा निकाल 93.83 टक्के

Subscribe

यंदाच्या वर्षी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा एकूण निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे. आज (ता. 02 जून) सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावीच्या निकालात कोकण मंडळाने बाजी मारत सर्वाधिक टक्केवारी मिळवली आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच दहावीच्या परिक्षेत बाजी मारली आहे.

हेही वाचा – SSC RESULT 2023 : दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता; ‘येथे’ क्लिक करून पाहा

- Advertisement -

यंदाच्या वर्षी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. तर गेल्या वर्षीपेक्षा 2.97 टक्क्यांनी निकाल घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. यंदा 23 हजार 13 माध्यमिक शाळांमधील 15 लाख 79 हजार 371 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली असल्याची माहिती समोर आली होती.

दहावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.87 टक्के आहे. तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 92.05 टक्के इतकी आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.82 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 03 लाख 34 हजार 35 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर 85 हजार 298 विद्यार्थी हे पास म्हणजेच उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. त्यामुळे विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून नागपूर निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के लागला आहे. तर 67 विषयांपैकी 25 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

विभागनिहाय निकाल

कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के

- Advertisment -