घरमहाराष्ट्र'मराठा' अशी जात नाही, ते तर कुणबी! वाचा मागास आयोगाचा निष्कर्ष

‘मराठा’ अशी जात नाही, ते तर कुणबी! वाचा मागास आयोगाचा निष्कर्ष

Subscribe

'मराठा' ही स्वतंत्र जात नसल्याचे मागास प्रवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात नमूद केलं असल्याचे समोर आले आहे.

मराठा समाज हा गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या लाभांपासून वंचित आहे. परंतु ‘मराठा’ ही मुळात कोणतीही वेगळी जात नसून हा समाज ‘कुणबी’ जातीतच मोडतो’,असं मागास प्रवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात नमूद केलं असल्याचे एबीपी माझाच्या वृत्तानुसार समोर आले आहे. कुणबी समाजाला ओबीसी वर्गात आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे मराठी समाजालाही आरक्षण मिळावं ही त्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी रास्त आहे, असं निरीक्षण नोंदवत राज्य मागास प्रवर्ग आयोगाने मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात करण्यात आली होती.

मराठा समाजही आरक्षणास पात्र

१९४२ मध्ये तात्कालीन सरकारने मराठी समाजाचाही मागास वर्गात समावेश केल्याची नोंद आहे. यानुसार त्यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजालाही पहिल्यांदा आरक्षण दिल्याची नोंद उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. मात्र १९५० मध्ये केंद्र सरकारने जेव्हा देशातील अनुसूचित जाती जमातींची नव्याने यादी बनवण्यात आली होती. त्यावेळी ‘मराठा’ ही जात काढण्यात आली. त्यानंतर १९६६ मध्ये केंद्र सरकारने या यादीमध्ये सुधारणा केली होती. त्यावेळी ‘कुणबी’ समाजाचा देखील ओबीसी या जातीमध्ये समावेश करण्यात आला. ज्या अर्थाने माराठा आणि कुणबी ही एकच जात असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. त्यानुसार मराठी समाजही आरक्षणास पात्र असल्याचे मत आयोगाने नोंदवलं आहे.

- Advertisement -

मराठा ही जात नाही

मराठा ही जात नसून तो मराठी बोलणाऱ्यांचा समुदाय आहे. तसेच त्यांची जात कुणबी असून शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच मराठा हा समाजसुद्धा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्या मागास असल्याचं आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे. साल २०१३ ते २०१८ दरम्यान राज्यात १३ हजार ३८६ शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये मराठी समाजातील शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. या आकडेवारीनुसार २३.५६ टक्के मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर कुणबी समाजातील १९.३४ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आल्यामुळे या समाजाची बिकट अवस्था असल्याचे समोर येत असून अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.


वाचा – मराठा आरक्षण घाईघाईने केलेला एकपात्री प्रयोग

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -