घरट्रेंडिंगराज्य मंत्रिमंडळाचा दिवाळीपर्यंत विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाचा दिवाळीपर्यंत विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दानवे यांनी भाजपचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत या मुद्द्यावर गहन चर्चा केली होती.

येत्या दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची महिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. याआधी राज्य मंत्रिमंडणाचा विस्तार नवरात्रीच्या सुमारास करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपर्यंत हा विस्तार केला जाणार आहे. याआधी अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ‘लवकरच विस्तार होईल’ असे सांगितले होते. याशिवाय काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री मीच असेन’, असे वक्तव्यही एका कार्यक्रमात केले होते. ज्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी, ‘राज्यात दुष्काळ असताना या गोष्टी बोलणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री अजून झोपेत आहेत’, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती.


वाचा: एम. जे. अकबर यांनी का दिला राजीनामा?

मध्यंतरी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत जाऊन, मत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा देखील केली होती. उपलब्ध माहितीनुसार, फडणवीस आणि दानवे यांनी भाजपचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत या मुद्द्यावर गहन चर्चा केली होती. तसंच या बैठकीत शिवसेनेसोबत जागावाटप, खडसेंचा मंत्रिमंडळातील समावेश आदी विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. सूत्रांनुसार, महामंत्री रामपाल यांच्यासोबत झालेल्या ४ तासांच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी निगडीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आता केलेल्या या नव्या घोषणेमुळे दिवाळीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


वाचा: आता खेळाडूबरोबर पत्नीही जाणार परदेश दौऱ्यावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -