घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यांत, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यांत, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा

Subscribe

मुंबई : तब्बल १५ दिवस झाले तरी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पण हा विस्तार लवकरच पण दोन टप्प्यांत होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांची बैठक नुकतीच झाली, त्यात फडणवीस यांनी ही माहिती दिली. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता दोन टप्प्यांत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी लहान प्रमाणात विस्तार केला जाईल. तर अधिवेशनानंतर मोठा विस्तार केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार होते. मात्र, राष्ट्रपती निवडणूक त्याच दिवशी असल्याने ते पुढे ढकलण्यात आले. आता ते २५ जुलैपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.

हेही वाचा – शक्तिमान बनायला गेला अन् कचऱ्याच्या गाडीत पडला, व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीनंतर सुरू झालेला सत्तासंघर्षादरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात एकमेकांविरोधात याचिका दाखल केल्या. त्याची सुनावणी ११ जुलै रोजी होणार होती. त्यामुळे ११ तारखेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अटकळ होती. परंतु ११ जुलैच्या सुनावणीत न्यायालयाने ही सुनावणी स्वतंत्र पीठाकडे होईल, असे सांगितले.

आता शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होईल. त्यावेळी न्यायालयाकडून अनुकूल संकेत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – माझं ‘तेच’ हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -