घरमहाराष्ट्रShinde Cabinet in Ayodhya : शिंदे मंत्रिमंडळाचे रामलल्लाचे दर्शन लांबणीवर! 'हे' आहे...

Shinde Cabinet in Ayodhya : शिंदे मंत्रिमंडळाचे रामलल्लाचे दर्शन लांबणीवर! ‘हे’ आहे कारण

Subscribe

मुंबई : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे अखेर श्रीराम मंदिर उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आपल्या मंत्रिमंडळासाठी तिथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यास सज्ज झाले. पण तूर्तास तरी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – Narendra Modi : महिन्याभरात मोदी पुन्हा महाराष्ट्रात; कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं करणार उद्घाटन

- Advertisement -

अयोध्येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलल्लाच्या मूर्तीची पतंप्रधानांनी प्राणप्रतिष्ठाही केली. या सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारणही रंगले होते. या कार्यक्रमास न बोलावल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले होते. पण नंतर उशिरा त्यांना निमंत्रण देण्यात आले.

तथापि, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण होते. मात्र, रामलल्लाच्या दर्शनाला संपूर्ण मंत्रिमंडळासह जाण्याचे तिघांनीही निश्चित केले. येत्या सोमवारी म्हणजेच 5 फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळासह शिवसेना, भाजपा आणि अजित पवार गटाचे आमदार, खासदार रामलल्लाच्या दर्शनाला जाणार होते. त्याला आता दोनच दिवस बाकी असताना तूर्तास तरी हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Chhagan Bhujbal : विकासात्मक कामांसाठी शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा – छगन भुजबळ

राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती अतिशय मोहक असून मंदिराच्या उद्घाटनानंतर भक्तांचा पूर आल्याचे चित्र आहे, भाविकांची गर्दी तिथे कायम आहे. त्यात व्हीआयपींच्या येण्याजाण्यामुळे सर्वसामान्यांच्या दर्शनात अडचणीही येत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोळ्यांवर आज, शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून लेझर ट्रिटमेंट करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या दोन कारणास्तव शिंदे सरकारने अयोध्या दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया; कारण…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -