Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक; महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक; महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका आणि अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या आकडेवारीत घट होत होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आलेख वरच्या दिशेने जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका आणि अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असून आता नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहाव लागणार आहे.

आठ दिवसांचा दिला अल्टिमेट्म

- Advertisement -

गेल्या चार दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दररोज पाच हजारच्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. सोमवारी राज्यात ५ हजार २१० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत किंचित घटन झाली असली तरी देखील ठिकठिकाणच्या रुग्ण नोंदीतील चढ-उतार चिंता वाढवणारीच आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यात जर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसली तर राज्यात कडक निर्बंध लावले जातील, असा इशारा देखील देण्यात आला आहे. तर राज्यात अमरावती, अकोला, पुणे याठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

लोकलबाबत घेण्यात येईल निर्णय

कोरोनाच्या आकडेवारीत घट झाल्यानंतर १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांकरता लोकल सुरु करण्यात आली. या लोकलमुळेच कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – संजय राठोड हाच पूजा चव्हाण हिचा हत्यारा- चित्रा वाघ


 

- Advertisement -