घरताज्या घडामोडीराजकीय पक्षांशी संपर्क साधण्यास निवडणूक आयोगाला अडचणी, संपर्काचा तपशील त्वरित देण्याचे आवाहन

राजकीय पक्षांशी संपर्क साधण्यास निवडणूक आयोगाला अडचणी, संपर्काचा तपशील त्वरित देण्याचे आवाहन

Subscribe

राजकीय पक्षांच्या संपर्काच्या तपशिलाअफावी राजकीय पक्षांशी विविध कारणांमुळे संपर्क साधण्यास अडचणी येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे.

राजकीय पक्षांना संपर्क साधण्यास राज्य निवडणूक आयोगाला बऱ्याच अडचणी येत आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला संपर्क तपशील दिला नाही. ज्या राजकीय पक्षांनी संपर्क साधण्याचा तपशील दिला आहे तो लागत नसल्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना संपर्काचा तपशील देण्याचे आवाहन केलं आहे. राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत तसेच अन्य माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांकाचा उपयोग होतो. काही राजकीय पक्षांचा तपशील चुकीचा किंवा बदलेला असल्यामुळे संपर्क साधण्यात अडथळे येत आहेत. यापूर्वी देखील राज्य निवडणूक आयोगाने संपर्क तपशील देण्याचे आवाहन केलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या 305 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता, दूरध्वनी, ई-मेल आयडी आणि विद्यमान कार्यकारणीतील सदस्यांचा तपशील राज्य निवडणूक आयोगास सादर करावा असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी देखील केले होते. आयोगाच्या आवाहनानंतरही अनेक राजकीय पक्षांनी आपला तपशील दिला नाही आहे. काही राजकीय पक्षांनी तपशील दिला आहे परंतु त्यात आता बदल झाला आहे. त्यामुळे संबंधित राजकीय पक्षांनी नव्याने संपर्क तपशील द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

राजकीय पक्षांच्या संपर्काच्या तपशिलाअफावी राजकीय पक्षांशी विविध कारणांमुळे संपर्क साधण्यास अडचणी येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय पक्षांनी आपला संपर्काचा तपशील आयोगाच्या कार्यालयास टपालाने (राज्य निवडणूक आयोग, 1 ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.) किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावा. असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा : शिवसेना सत्तेसाठी लाचार ! कॉंग्रेस नेतृत्वाचे बाळासाहेबांच्या जयंतीला एक ट्विटही नाही- देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -