घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता, ९ प्रभागांची वाढ...

मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता, ९ प्रभागांची वाढ निश्चित

Subscribe

मुंबई महापालिकेच्या २०२२ मधील प्रस्तावित निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनातर्फे पाठवण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मंजूरी दिली आहे. पालिकेच्या २३६ प्रभागांचा अंतिम आराखडा मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. तसेच मुंबई महापालिकेचा प्रारूप आराखडा ओबीसी आरक्षण वगळून सूचना हरकतीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकांमध्ये २२७ ऐवजी आता २३६ प्रभाग असणार आहेत. म्हणजेच ९ प्रभागांची वाढ निश्चित करण्यात आली आहे.

या संदर्भातील प्रारूप आराखडा दिल्यानंतर या प्रभाग रचनेबाबत १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हरकती सूचना मागवल्या जाणार आहेत. ओबीसी आरक्षणा संदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांऐवजी २३६ प्रभाग

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांऐवजी २३६ प्रभाग बनवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने २३६ प्रभाग बनवण्याचा निर्णय घेतला होता. मागील आठ दिवसांपूर्वीच २३६ प्रभागांच्या सीमा निश्चित करून त्याचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर २८ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना २३६ प्रभागांबद्दलचा कार्यक्रम जाहीर करण्याची शिफारस केली होती. या अंतर्गत २३६ विभागांच्या सीमांबाबत हरकती सूचना मागवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम निश्चित करून दिला आहे.

१ फेब्रुवारीला अधिसूचना जारी केली जाणार

दरम्यान, १ फेब्रुवारी याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यानुसार १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत तक्रारी आणि सूचना मागवल्या जाणार असून १६ फेब्रुवारीला तक्रार सूचनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. तसेच १६ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत तक्रारीचं निवारण करण्यात येणार आहे. त्यानंतर २ मार्च रोजी शिफारशीसह विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाने सादर करावं, असं पत्रात म्हटलंय.

- Advertisement -

हेही वाचा : U19 World Cup: कॅनडा क्रिकेट टीमचे ९ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, २ सामने रद्द


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -