घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह यांची अटक ९ जूनपर्यंत टळली

परमबीर सिंह यांची अटक ९ जूनपर्यंत टळली

Subscribe

येत्या ९ जूनपर्यंत राज्य सरकारची अटक न करण्याची हायकोर्टात हमी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित अॅट्रोसिटीच्या प्रकरणात आज सोमवारी पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान अॅट्रोसिटीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक करण्यात येणार नाही असे आश्वासन रा्य सरकारकडून हायकोर्टाला देण्यात आले. हायकोर्टाने या प्रकरणात परमबीर सिंह यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करावे असे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणातील सुनावणी सुट्टीकालीन कोर्टात घेण्याएवजी नियमित कोर्टाच्या कामकाजात घेण्यात येईल असे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले. दोन आठवड्यानंतर आता प्रकरणात सुनावणी होणे अपेक्षित आहे. तोवर परमबीर सिंह यांची अॅट्रोसिटी प्रकरणातील अटक टळली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना येत्या ९ जूनपर्यंत अटक करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी दिले. त्याचवेळी एकाच प्रकरणात दोन ठिकाणी दिलासा मागता येणार नाही, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळेच परबीर सिंह यांनी सध्या या प्रकरणातील हायकोर्टातील याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. आज सोमवारी हायकोर्टाच्या दोन सदस्यीय खंडपिठापुढे ऑनलाईन पद्धतीने सुनावणी पार पडली.

सूडबुद्धीने कारवाईचा उद्देश नाही

परमबीर सिंह यांच्यावर कोणत्याही सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत नाही असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे आणि परमबीर सिंह यांच्यात मतभेद असतील पण त्याचा या प्रकरणात काहीही संबंध नाही. परबीर सिंह हे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना ही कारवाई दरम्यानच्या काळात झाली नाही. या संपुर्ण प्रकरणात तथ्य आढळल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचे राज्य सरकारमार्फत सांगण्यात आले. परमबीर सिंह यांच्याविरोधात भीमराव घाडगे यांनी २०१५ मध्ये अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दिली होती. पण दरम्यानच्या काळात पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणातून घेतलेला काढता पाय, त्यांच्या सुरू असलेल्या वाटाघाटी यातून राज्य सरकारकडूनच हे सगळ सुरू होते असे परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. परबीर सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी केलेल्या खुलाशानुसार अनिल देशमुखांविरोधात लिहिलेल्या पत्राचा हा सूड उगवण्यासाठीच हा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप जेठमलानी यांनी केला.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

याआधी २०१५- २०१८ मध्ये काही प्रकरणांचा तपास करताना ठराविक लोकांना आरोपी न करण्यास परमबीर सिंह यांनी घाडगे यांना स्पष्ट केले होते. ही बाब घाडगे यांनी मान्य केले नाही. त्यामुळे परमबीर सिंह यांनी आपल्याला मानहानीची वागणूक देत खोटे गुन्हे दाखल केले. तसेच आपला मानसिक छळ करतानाच जातीवाचक शिवीगाळ केल्याचे हे प्रकरण घाडगे यांच्याकडून दाखल करण्यात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -