कथित 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांची होणार CBI चौकशी; राज्य सरकारची संमती

mumbai court rejected bail plea of former minister anil deshmukh money laundering

मुंबई – 100 कोटी वसुली प्रकरणामुळे कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुखांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने CBI ला संमती दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय राज्यपाल घेणार आहेत.

राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अनिल देशमुखांच्याविरोधात सीबीआय चौकशीला संमती दिली आहे. एखादा शासकीय अधिकारी किंवा माजी मंत्री भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असेल तर खटला चालवण्यास राज्य सरकारची अनुमती लागते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णय झाला आहे. अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या विरोधात CBI ने या आधीच दोषारोपत्र दाखल केला आहे.

सचिन वाझे माफीचा  साक्षीदार  –

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्वीय सहायक संजीव पलांडेच्या जामीन अर्जावर CBI ने उत्तर सादर केले आहे. सचिन वाझे अनिल देशमुखांना नंबर 1 म्हणायचा तर परमबीर सिंगला राजा असे म्हणायचा, अशी माहिती सीबीआयने उत्तरात दिली आहे. संजीव पलांडे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबईतल्या बार मालकाकडून नंबर 1 च्या नावाखाली पैसे वसूल करत होता, असा सचिन वाझेचा जबाब आहे. या प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे.