घरCORONA UPDATEराज्य सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी - देवेंद्र फडणवीस

राज्य सरकार कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी – देवेंद्र फडणवीस

Subscribe

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने त्यासाठी पॅकेज जाहीर करावे.

राज्यात उद्भवलेले कोरोना साथीचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने त्यासाठी पॅकेज जाहीर करावे. बारा बलुतेदारांचाही विचार सरकारने करावा, अशी मागणी करताना फडणवीस यांनी अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार पॅकेज कधी करणार? असा सवाल केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत स्थलांतरित मजुरांची हेळसांड, शेतमाल खरेदी न करणे, गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्य व्यवस्था कोलमडणे, रुग्णसंख्या लपविणे आदी मुद्द्यांकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले. या भेटीनंतर बोलताना फडणवीस यांनी कोरोनाच्या संदर्भातील उपाययोजनांवरून सरकारला लक्ष्य केले. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारकडून कोरोनाचा सामना योग्यरित्या होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

एकीकडे अनेकांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे.  शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळत नाही. शेतकऱ्यावर संकट आले आहे. बारा बलुतेदारही  अडचणीत आहेत. केंद्र आणि इतर राज्यांनी पॅकेज दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही पॅकेज द्यावे, असे  फडणवीस म्हणाले. शरद पवार पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. राज्य सरकारकडून उपाययोजना नव्हे तर केवळ राजकारण सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -