घरCORONA UPDATEरूग्ण वाहिकेसाठी आता 'इतके' रूपये मोजावे लागणार, शासन निर्णय जारी

रूग्ण वाहिकेसाठी आता ‘इतके’ रूपये मोजावे लागणार, शासन निर्णय जारी

Subscribe

महाराष्ट्र सरकारने खाजगी रूग्णवाहिकेसाठी दर निश्चिती करण्यासाठीचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे खाजगी रूग्णवाहिका ऑपरेटर्सच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. रूग्णांकडून अवाजवी पद्धतीने रक्कम आकारण्याच्या तक्रारी शासन दरबारी आल्या आहेत. त्यामुळेच खाजगी रूग्णवाहिकांचा वापर करण्याचा तसेच दर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- Advertisement -

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात प्रत्येक किलोमीटरसाठीची दरनिश्चिती शासनाने केली आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रूपये ते २४ रूपये या टप्प्यात हे दर असावेत. तर इतर ठिकाणासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या माध्यमातून रूग्णवाहिकाच्या दराची निश्चिती करण्यात येईल. मुंबई आणि मुंबई प्रदेश विभागात रूग्णवाहिकेचा दर हा २४ तासांसाठी किमान ७०० रूपये किंवा १४ रूपये प्रति किलोमीटर असेल. तर कमाल दर हा ११९० रूपये २४ तासांसाठी किंवा २४ रूपये प्रति किलोमीटर इतका दर आकारता येईल. तर आयसीयु किंवा एअर कंडीश्नर रूग्णवाहिकेसाठी २४ तासांसाठी ११९० किंवा २४ रूपये प्रति किमी असा दर आकारता येईल.

किमान किंमतीच्या आधारावर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रूग्णवाहिकाचे दर निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. एखादी खाजगी रूग्णवाहिका वापरताना किती पैसे मोजावेत याबाबतचा निर्णयही घेणाचा अधिकार यांना देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने परिपत्रक काढून याबाबतची दरनिश्चितीचा शासन निर्णय स्पष्ट केला आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या रूग्णांची संख्या पाहता हा शासन निर्णय जाहीर केला आहे. जे रूग्ण सिरीयस स्थितीत नसतील अशा रूग्णांसाठी खाजगी वाहने घेण्याचाही उल्लेख या शासन निर्णयात आहे. फक्त सिरीयस रूग्णांसाठीच रूग्णवाहिकेचा वापर करण्यात येईल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -