घरताज्या घडामोडीदोन लसीचे डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिलासा, आरटीपीसीआर चाचणीमधून सूट

दोन लसीचे डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिलासा, आरटीपीसीआर चाचणीमधून सूट

Subscribe

प्रवाशांना सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे पालन करणे बंधनकारक

राज्य सरकारने दोन लसीचे डोस घेतलेल्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णायानुसार ज्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी मधून सूट दिली आहे. प्रवाशांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि जर लस घेऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला असेल तर त्यांना कोरोना आरटीपीसीआर निगेटीव्ह अहवाल दाखवावा लागणार नाही. तसेच त्या प्रवाशाने कोविन पोर्टलवरुन लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य राहणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोव्हिड-१९ वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रवाशांना सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे (चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारिरीक अंतर राखणे इ.) पालन करणे बंधनकारक राहणार आहे. इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ 48 तासांवरून वाढवून 72 तास इतका करण्यात आल्याचे एका पत्रका मार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -