केंद्रानंतर राज्याचाही दिलासा, पेट्रोल 2.8 पैशांनी तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त

state government has reduced VAT on petrol and diesel
state government has reduced VAT on petrol and diesel

केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोल- डिझेलचे दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांची तर डिझेलच्या दरात 6 रुपयांची कपात केली होती.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यांना पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट कमी करावा असे आवाहन केले होते. त्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल- डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महविकास आघाडी सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कर कमी केल्यामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.

पेट्रोल-डिझेलचा नवा दर –

व्हॅट कमी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. सरकारने डिझेलवर 1 रुपये 44 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.