घरमहाराष्ट्ररुग्णांबाबत राज्य सरकार उदासीन - अनिल गलगली

रुग्णांबाबत राज्य सरकार उदासीन – अनिल गलगली

Subscribe

राज्य सरकारची इच्छाशक्ती नसल्यामुळे या महत्वाच्या कायद्याचा मसुदा धूळखात पडून आहे, असा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.

‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेन्ट ऍक्ट’ अर्थात ‘वैद्यकीय अस्थापन नोंदणी आणि नियमन विधेयक’ लागू करण्याबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. अनिल गलगली यांच्या सांगण्यानुसार, केंद्र सरकारने २०१२ मध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेन्ट ऍक्ट म्हणजे वैद्यकीय अस्थापन नोंदणी आणि नियमन विधेयक लागू केले. या कायद्यात केंद्राने सुधारणा करत कायदा आणखी सक्षम करत त्यावर सूचना-हरकती मागवल्या आहेत. मात्र, असे असताना राज्य सरकारने इतकी वर्षे उलटूनही हा कायदा लागू केलेला नाही. त्यामुळे रुग्णांच्या दृष्टीने हा इतका महत्त्वाचा कायदा असूनही, राज्य सरकार त्याबाबत उदासीन आहे, असा आरोप गलगली यांनी केला आहे. गलगली हे रुग्ण सेवा कल्याण या सेवाभावी संस्थेतर्फे जागतिक किडनी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.


खुशखबर : Jio च्या ग्राहकांना 2 GB फ्री डेटा

अनिल गलगली पुढे म्हणाले की, ‘हा कायदा लागू झाल्यास वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता येईल. त्यामुळे रुग्णांना माफक आणि योग्य आरोग्य सेवा मिळेल. मात्र, राज्य सरकारची इच्छाशक्तीच नसल्यामुळे या कायद्याचा मसुदा धूळखात पडून आहे. याआधीच्या सरकारनेही याकडे लक्ष दिले नाही आणि हे सरकारही उदासीन आहे. धीरुभाई अंबानी रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ संजय ठाकूर म्हणाले की, ‘आरोग्य सेवेच्या दुरावस्था बाबतीत आपल्या देशाची अवस्था वाईट असल्याचे सांगत परदेशात आरोग्य सेवेच्या महत्त्वेवर प्रतिपादन केले. तर आहार तज्ञ डॉ. सीमा साळे यांनी किडनी रुग्णांना कोणकोणत्या आहाराने लाभ होईल त्याची सविस्तर माहिती दिली. रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी केंद्र, राज्य आणि महापालिका स्तरावर अस्तिवात असलेल्या विविध योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजक जितेंद्र तांडेल यांनी या संस्थेच्या कार्याची माहिती देत लवकरच वेबसाईट आणि टोल फ्री नंबर सुरु करणार असल्याची घोषणा केली. प्रास्तविक भारती तांडेल यांनी तर संचालन जय साठेलकर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -