घरताज्या घडामोडीराज्य सरकारचे पुन्हा बदल्यांचे आदेश, ८ सनदी अधिकाऱ्यांची नावं!

राज्य सरकारचे पुन्हा बदल्यांचे आदेश, ८ सनदी अधिकाऱ्यांची नावं!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये एकूण ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महाविकासआघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेकदा करण्यात आल्या आहेत. नवीन सरकार आल्यानंतर अशा प्रकारे जुन्या सरकारच्या काळातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणं ही सामान्य बाब झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकारने देखील राज्यातल्या महत्त्वाच्या पदांवरील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचं दिसून आलं आहे. आता राज्य सरकारने नव्याने काढलेल्या आदेशांनुसार तब्बल ८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अश्विनी मुदगल, पी. सिवा शंकर, सुनील चव्हाण, श्वेता सिंघल अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

कुणाच्या झाल्या बदल्या?

१) अश्विनी मुदगल यांची नी मुंबई सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

२) पी. सिवा शंकर यांची नियुक्ती पुण्याच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे

३) सुनील चव्हाण चव्हाण यांची औरंगाबादच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे

- Advertisement -

४) अरिबम शर्मा यांची ग्रामविकास खात्याच्या उपसचिव पदावरून हिंगोली जिल्हा परिषदेचे उपसचिव या पदावर बदली करण्यात आली आहे

५) श्वेता सिंघल यांची मुंबईतील महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होतं

६) नयना गुंडे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक पदावरून यशदाच्या उपमहासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे

७) आर. एस. जगताप यांची औरंगाबादचे विक्रीकर सहआयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे

८) ए. ए. गुल्हाणे यांची नवी मुंबईच्या जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे.


याआधी झालेल्या बदल्या – मनिषा म्हैसकर यांची बदली, एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -