घरताज्या घडामोडीरमजानमध्ये सामूहिक नमाज पठण होणार नाही, जाणून घ्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना

रमजानमध्ये सामूहिक नमाज पठण होणार नाही, जाणून घ्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना

Subscribe

धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन झासनाच्या नियमांचे पालन करुन बंद जागेत शक्‍यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू केले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व धार्मिक कार्यक्रम, सभा, मेळावे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही रमजान साध्या पद्धतीने साजरी करावी अशी सूचना राज्य सरकारद्वारे देण्यात आली आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळ आणि प्रार्थना स्थळांवर एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ जणांपेक्षा एकत्र जमू नये आणि सामाजिक अंताराचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिझाय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी दि. १३ किंवा १४/४/२०२१ चंद्रदर्शनावर अवलंबून) ते दि. १३ किंवा १४/५/२०२१ पर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ४ एप्रिल, २०२१ नुसार पारीत केलेल्या आदेझानुसार व त्यातील मुद्दा क्र.१, २ व १३ च्या अधिन राहून या वर्षी पवित्र रमजान महिना साजरा करणे आवडयक आहे. त्यास अनुसरून दि. १३ किंवा १४/४/२०२१ रोजी पासून सुरु होणाऱ्या मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिना साजरा करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महीन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मश्निदीमध्ये अथवा सार्वजनीक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरीता म्षिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५पेक्षा जास्त व्यक्‍तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.

- Advertisement -

या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पुर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.

पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात मडिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतू यावेळी कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मझषिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतू यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.

पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरीता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. तसेच याबाबत स्थानिक प्रज्ञासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन झासनाच्या नियमांचे पालन करुन बंद जागेत शक्‍यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत.

कोवीड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात फॉ.दं.पर.सं.कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

या पवित्र रमजान महीन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा. राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

१०८ धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साघेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.

पवित्र रमजान महिन्यात सोडल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रश्ञासन यांनी विहीत केलेल्या ‘नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -