Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र खासगी कार्यालयांसाठी Work from Home सक्तीची शक्यता, कोरोना नियंत्रणासाठी सरकारची नवी शक्कल

खासगी कार्यालयांसाठी Work from Home सक्तीची शक्यता, कोरोना नियंत्रणासाठी सरकारची नवी शक्कल

राज्य सरकारचा निर्णय सर्व खासगी कंपन्या मान्य करतील का?

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्याची वाटचाल आता पुन्हा लॉकडाऊनकडे चालली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान गर्दी होत आहे. ट्रेनमध्ये, बस आणि मेट्रोची गर्दी तसेच इतर ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकार सर्व खासगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे. पुन्हा लॉकडाऊन केल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोजगारावर सुवर्णमद्य काढता येईल काय यावर राज्य सरकार विचार करत आहेत.

कर्मचाऱ्यांची प्रवासादरम्यान होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार सर्व खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. याबाबत काही आयटी क्षेत्रातील तज्ञ अभ्यास करत आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः याबाबत आढावा घेणार आहेत. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अन्यथा येणाऱ्या काही दिवसांत याबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कर्मचारी वर्गाची प्रवासादरम्यान आणि कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसताना दिसत आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना पुढील काही महिने वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. कोरोना काळात कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय सर्व खासगी कंपन्या मान्य करतील का? यावर राज्य सरकार काय पाऊल उचलणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -